IMPIMP

Pune Crime News | पुणे : दोन कार चालकांमध्ये भररस्त्यात हाणामारी, 6 जण ताब्यात

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्यातील विधान भवन चौकामध्ये (Vidhan Bhavan Chowk Pune) दोन कारचालकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) संबंधितांवर गुन्हा दाखल करुन सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना सीआरपीसी 41(1) ची नोटीस दिलेली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास घडली होती.

याबाबत पोलीस नाईक विश्वनाथ सोनप्पा नाळकर (वय-39) यांनी बुधवारी (दि.27) सरकारतर्फे बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन चार चाकी क्रमांक एम एच 12 पी एन 3939 पांढऱ्या रंगाची जीप कंपास गाडी व दुसरी चार चाकी क्रमांक एम एच 14 एच डी 9043 लाल रंगाची स्विफ्ट गाडी मधील 8 ते 9 जणांवर आयपीसी 160 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास विधान भवन चौक पुणे येथे सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर चारचाकी क्रमांक एम एच 12 पी एन 3939 पांढऱ्या रंगाची जीप कंपास गाडी व दुसरी चार चाकी क्रमांक एम एच 14 एच डी 9043 लाल रंगाची स्विफ्ट गाडी मधील 8 ते 9 जणांनी विधान भवन चौकात त्यांच्याकडील गाडी रोडचे मध्ये थांबवली. आरोपींनी वाहतूक कोंडी करून एकमेकांसोबत वाद घालून एकमेकांना मारहाण केली. तसेच एकमेकांना मोठ्या मोठ्याने शिवीगाळ करून आरडाओरड करीत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर शांततेचा भंग केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी निष्पन्न केले. निष्पन्न केलेल्या आरोपी पैकी 6 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना सीआरपीसी 41(1) ची नोटीस दिलेली आहे. उर्वरित आरोपींवर लवकरच कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार (PI Sandipan Pawar ) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार (PSI Swapnil Lohar) करीत आहेत.

Pune Mahavitaran News | इंटरनेट केबलमुळे महापारेषणच्या टॉवर लाईनमध्ये बिघाड ! पुणे शहरात काही ठिकाणी तासभर वीजपुरवठा विस्कळीत

Related Posts