IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – महिलेचा खून करुन मृतदेह टाकला विहीरीत

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Woman killed and body dumped in a well

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | शेतातील कामगार महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा खून (Murder In Pune) केला. त्यानंतर तिचा मृतदेह (Dead Body) विहीरीत टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उषा अशोक देशमुख Usha Ashok Deshmukh (वय ५०, रा. माळवाडी, कवडीपाठ, लोणी काळभोर – Loni Kalbhor) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत स्नेहल अभय काळभोर (वय ५०, रा. मांजरी फार्म, मांजरी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२३) दिली आहे. ही घटना मांजरी येथील कुरण फार्म (Kuran Farm, Manjri) येथे सोमवारी दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतात उषा देशमुख या कामगार म्हणून काम करत होत्या. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे कामाला आल्या होत्या. सायंकाळी त्या न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केल्यावर त्याचां मृतदेह विहीरीत पडलेला आढळून आला. त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांचा खून केला असल्याचे व त्यानंतर मृतदेह विहीरीत टाकून दिल्याचे दिसून आले. हडपसर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station – Woman killed and body dumped in a well

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्त्युत्तर, म्हणाले-‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि…’

Pune PMC Water Supply Dept News | पुणे महानगरपालिका : शहरात लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात ! अल निनोच्या पार्श्‍वभूमीवर मनपाची तयारी सुरू

Bombay High Court | …तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Bombay High Court | …तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra IPS Transfer | आयपीएस अनिल पारसकर, अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, शशिकुमार मीना, प्रविण पाटील, अरविंद चावरिया यांच्यासह 10 जणांना पोलिस उप महानिरीक्षक पदी बढती

 

Related Posts