IMPIMP

Pune Crime News | पुणे पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई ! खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर परीसरात गुटखा विक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune police action against gutkha sellers for the second day in a row! 11 people were arrested for selling gutkha in Khadak, Bharti Vidyapeeth, Sahakarnagar, Alankar, Uttamnagar, Dattawadi, Wanwadi, Hadapsar, Kondhwa, Loni Kalbhor area.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | पुणे शहरात अवैधपणे गुटख्याची विक्री (Gutkha) , साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police News) मोहिम सुरु केली आहे. गुरुवारी (दि.2) शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात (Gutkha Ban News) कारवाई (Pune Crime News) करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी 15 ठिकाणी कारवाई करुन 11 जणांना अटक केली आहे. तर या कारवाईत 4 लाख 59 हजार 138 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरुवारी पुणे पोलिसांनी गुटखा विक्री आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर कारवाई करुन 32 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 22 जणांना अटक (Arrest) केली होती.या कारवाईत 2 लाख 97 हजार 328 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे पोलिसांनी शुक्रवारी खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पान शॉप, किराणा दुकानात गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime News)

 

खडक पोलिसांनी (Khadak Police Station) कस्तुरी चौकात अमितकुमार धुन्नीलाल पटेल (वय-20 रा. गंजपेठ, पुणे) याला अटक करुन त्याच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा एकूण 50 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अंबेगाव पठार येथील एका घरावर छाप टाकून 35 हजार 420 रुपयांचा साठा करुन ठेवलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करुन ज्ञानेश्वर रामराव देवकुळे (वय-42) याला अटक केली.

 

सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) रात्री पावणे दहाच्या सुमारास धनकवडी येथील जय शंकर पानशॉप येथे छापा टाकून 1915 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाीत टपरी मालक शुभम सतीश मानकुसकर (वय-38 रा. धनकवडी) याला अटक केली आहे. प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठा करणे कायद्याने गुन्हा असताना गुटख्याचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्या विनय शिवपुजन तिवारी (वय-34) याला अटक करुन 6987 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अलंकार पोलिसांनी (Alankar Police Station) सायंकाळी सहाच्या सुमारास एरंडवणे डिपी रोडवर केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police Station) संतोषदेवी जगदिश प्रजापती (वय-27) याच्यावर गुन्हा करुन त्याने अवैधपणे साठा करुन ठेवलेला 1 लाख 78 हजार 596 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई कोंढवे धावडे येथील एन.डी.ए. गेट समोरील खोलीत केली. दत्तवाडी पोलिसांनी (Duttawadi Police Station) जनता वसाहत येथील हजरत जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून 4364 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वसीम सैपन बलुरगी (वय-34) याला अटक केली आहे.

 

वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) जगदीश केसाराम कुमहार (वय-38)
याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 1396 रुपयांचा गुटखा जप्त केला.
हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station)हद्दितील पाच ठिकाणी करावाई करुन 50 हजार 921
रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा येथील एन.आय.बी.एम रोडवरील पप्पू पानशॉप येथे करण्यात आलेल्या कारवाईत
1 लाख 26 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर जीतलाल श्रीरामनंदन यादव (वय-39 रा. कोंढवा खुर्द) याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे.

 

लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) पुणे-सोलापूर रोडवरील माळीमळा येथील
मैफिल हॉटेल समोरील पान शॉप मधून 1594 रुपयांचा गुटखा जप्त करत तुफानसिंग रामसुमेर प्रजापती
(वय-34) याला अटक केली. तर उरुळी देवाची येथील शिव पानशॉप मधून 1350 रुपयांचा गुटखा जप्त करुन
संदीप रामफेर प्रजापती (वय-21) याला अटक केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune police action against gutkha sellers for the second day in a row! 11 people were arrested for selling gutkha in Khadak, Bharti Vidyapeeth, Sahakarnagar, Alankar, Uttamnagar, Dattawadi, Wanwadi, Hadapsar, Kondhwa, Loni Kalbhor area.

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime News | दुर्दैवी ! खेळत असताना पिठात पडल्यामुळे नाकातोंडात पीठ जाऊन 9 महिन्यांच्या बालकाचा अंत

WPL 2023 Schedule | 4 मार्चपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; 5 संघांमध्ये पार पडणार चुरस

Pune Pimpri-Chinchwad Crime | किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, तीन जणांना अटक; चाकण परिसरातील घटना

 

Related Posts