IMPIMP

Pune Pimpri-Chinchwad Crime | किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, तीन जणांना अटक; चाकण परिसरातील घटना

by nagesh
Beaten

चाकण : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri-Chinchwad Crime | बांधकामाचे साहित्य आमच्याकडून का घेतले नाही याचा राग मनात धरून टोळक्याने एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) केली. तर एकाच्या डोक्यात कोयत्यासारख्या हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार (Pune Pimpri-Chinchwad Crime) गुरुवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास भोसे गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करुन तीन जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदु सखाराम लोणारी, सखाराम विठ्ठल लोणारी, बबलु उर्फ चंद्रशेखर सखाराम लोणारी, कृष्णा खंडु अरगडे, संतोष महादु गांडेकर यांच्यासह इतरांवर 307,324, 504,506, 143,147, 148,149 नुसार गुन्हा दाखल करुन नंदु लोणारे, सखाराम लोणारी आणि संतोष गांडेकर यांना अटक केली आहे. (Pune Pimpri-Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आमच्याकडून बांधकामाचे साहित्य का घेतले नाही याचा राग मनात धरुन फिर्यादी यांचे दिर नवनाथ किसन गांडेकर यांना शेतातून ऊस वाहतूक करताना आडवले. याठिकाणाहून ऊसाची वाहतूक करायची नाही म्हणत सखाराम लोणारे याने हातीतील दगड डोक्यात मारुन नवनाथ यांना जखमी केले.
तर चंद्रशेखर लोणारी व कृष्णा अरगडे यांनी काठीने व लोखंडी रॉडने डोक्यात, पाठीवर मारले.
तर संतोष गांडेकर आणि इतर अनोळखी व्यक्तींनी काठीने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली.

 

आरोपी नंदु लोणारी याने कोयत्यासारख्या धारदार हत्याराने फिर्य़ादी यांचे चुलत सासरे तुळशीराम यांच्या
डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तुळशीराम गंभीर जखमी झाले आहेत.
यानंतर आरोपींनी आज कोणाला सोडायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर (PSI Shendkar) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri-Chinchwad Crime | Two people were brutally beaten up by the gang for a minor reason, three people were arrested; Incidents in Chakan area

 

हे देखील वाचा :

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, Video आला समोर

Satara Crime News | भावाने फसवणूक केल्यामुळे तरूणाने व्हॉटस्अप स्टेटस ठेवत उचलले ‘हे’ पाऊल

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

 

Related Posts