IMPIMP

Pune Crime News | नोकरीच्या आमिषाने पॅकेज घेण्यास भाग पाडून तरुणांची केली जातेय फसवणूक; डेक्कन जिमखान्यावरील सीकेवाय, केकेवाय कंपनीच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना पॅकेज घेण्यास भाग पाडून कोणतेही प्रशिक्षण न देता अनेक तरुणांची फसवणूक (Fraud Case) केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सी के वाय व के के वाय कंपनीचे चंदनकुमार यादव आणि कुंदनकुमार यादव व इतर (डेक्कन हाईटस, डेक्कन जिमखाना) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११/२३)दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला एका महिलेचा २४ डिसेबर रोजी फोन आला. तिने नॅसविझ कंपनीबाबत माहिती देऊन नोकरी करायची असेल तर डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानुसार हा तरुण कंपनीत गेला. त्याला कंपनीत १० ते १२ हजार रुपये प्रति आठवडा पगार मिळेल, असे सांगून त्यांची तीन पॅकेजेस आहेत, त्यात १२ हजार ५०० चे मेडिसीन, १४ हजार ५५० रुपयांचे तीन शर्ट, तीन पँट व १५ हजार ५५० रुपयांचे कोट व पँट असे आहेत. त्यापैकी कोणतेही एक पॅकेज घ्यावे लागेले, असे सांगितले. तुम्ही कंपनीत भरती झाल्यानंतर या पॅकेजेसचे मार्केटिंगचे काम करावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजून पगार हवा असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना कंपनीबाबत माहिती देऊन त्यांना कंपनीत भरती होण्यास सांगा,
असे सांगितले. त्यानंतर त्यांना १४ हजार ५०० रुपये अ‍ॅडव्हान्स भरायला सांगितले.
तेवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर तुम्ही आता कंपनीचे मेंबर झाले आहात.
त्यामुळे तुम्हाला पैसे भरल्याशिवाय येथून जाता येणार नाही, असे सांगून त्यांना बसवून ठेवले.
त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेले १० हजार ५०० रुपये भरले. उरलेले पैसे दोन दिवसात भरा,
असे सांगून त्यांचे आधार कार्ड घेतले. त्यांना पैसे भरल्याची पावतीही देण्यात आली नाही.

 

त्यानंतर ते उरलेले ४ हजार रुपये भरण्यासाठी गेले असताना नासविझ या कंपनीच्या पत्त्यावर सीकेवाय एंटरप्रायझेस यानावाचे कार्यालय दिसले. त्यांनी योगेश नावाच्या व्यक्तीकडे पैसे भरले.
त्यांना बेसिक ट्रेनिंग दिले जाईल, उद्यापासून या असे सांगण्यात आले.
त्यानंतर ते ५ ते १० जानेवारी रोज दुपारी १२ ते ४ जात होते. परंतु त्यांना कोणतेही ट्रेनिंग देण्यात आले नाही.
त्यांच्याप्रमाणेच इतरांना नोकरी देण्याच्या नावाखाली पॅकेजचे पैसे घेऊन कार्यालयात बसवून ठेवले जात
असल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक (Cheating Case) होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी
डेक्कन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Youths are being cheated by forcing them to take packages with the lure of jobs; CKY on Deccan Gymkhana, Crime against employees of KKY Company

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

 

Related Posts