IMPIMP

Pune Crime | PM आवास योजनेतील व्हीआयपी कोठ्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | 66-year-old sister lodges complaint against 70 year old brother in Pune; Know the case of Wanwadi

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –   Pune Crime | पंतप्रधान आवास योजनेतील (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळवून देतो, असे सांगून पाच जणांची फसवणूक करणार्‍या दोघांना निगडी पोलिसांनी (Nigdi Police) अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे),
योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. घुलेनगर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी रवींद्र बबन शिंदे (वय ३१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिंदे व इतर संतोष चव्हाण, गोरक्षनाथ गवंड, प्रविण गावडे, बबन लोंबाटे यांना या दोघांनी चिखलीमधील (chikhli) घरकुल (Gharkul) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळून देतो.
असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून त्यासाठी वेळोवेळी ७ लाख ६२ हजार रुपये घेतले.
मात्र, त्यांना घर व गाळा मिळवून दिला नाही.
तसेच त्यासाठी घेतलेले पैसे परत केले नाही.
फिर्यादी व इतरांनी अनेकदा पैशांची मागणी केल्यानंतरही ते न दिल्याने शेवटी त्यांनी
पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ
(Assistant Police Inspector Vijaykumar Dhumal) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | PM arrested for cheating under the guise of getting a house from a VIP room in the housing scheme

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सकाळी गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह सायंकाळी विहिरीत आढळल्यानं पुण्यात खळबळ

MLA Devendra Bhuyar | तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या आमदारास 3 महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड

Coronavirus | कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

Related Posts