IMPIMP

Pune Crime | सकाळी गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह सायंकाळी विहिरीत आढळल्यानं पुण्यात खळबळ

by nagesh
Pune Crime | the deadbody of a 19 year old girl was found in a well a disturbing incident in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील (ambegaon) कळंब येथील गणेशवाडीमधून १९ वर्षीय तरुणी सकाळी शेतातील पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेली असता परतलीच नाही. सर्वत्र तिचा शोध घेतली परंतु मिळून आली नाही. सायंकाळी मात्र तेथीलच शिवारातील एका विहिरीमध्ये त्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शुभांगी संजय भालेराव असे तिचे नाव आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यातून वाचताना ती विहिरीत पडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. तर
घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट दिली असून शुभांगीचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सध्या तरी
पोलिसांनी तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे याचा अंदाज व्यक्त केला नाही.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील शेतकरी संजय खंडू भालेराव हे सोमवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी निरगुडसर
येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेली होती. सकाळची साडेनऊ वाजता बबन भालेराव यांच्या सार्वजनिक हिस्सा असलेल्या विहिरीतून शेती
पंपाद्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी शुभांगी गेली होती. त्यानंतर काही वेळानंतर शुभांगी कोणालाही दिसली नाही. त्यामुळे ती मंचर येथील
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीला गेली असावी असा समज झाला. दुपार झाल्याने शुभांगीचा भाऊ शुभमने गावातील स्वप्निल खंडागळे याला शुभांगी
अकॅडमीला आली का? असे विचारले असता स्वप्नीलने सांगितले की, ती आज आली नाही शेजारी वहिनीकडे गेली असावी हे समजून ती बराच वेळ वाट
पाहूनही घरी आली नाही.

 

त्याने तिचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यानंतर सायंकाळी स्वप्निल खंडागळे आणि तेथील शेजारी नातेवाईक आणि शुभांगी
चा धाकटाभाऊ शुभम यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीला पाणी भरपूर असल्याने अंदाज येत नव्हता.
अखेर शेवटी गळ टाकून पाहिले असता गळाला काहीतरी जड लागते असे समजून त्यांनी गळ अधिकच खोलवर सोडला.
त्याद्वारे शुभांगीचे कपडे गळाला लागले.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुभांगीला विहिरी बाहेर काढले असता ती मृत झाल्याचे दिसून आले.
परंतु, तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लोचके तोडलेले दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शुभांगीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले.
ती जीव वाचवण्यासाठी विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा,
किंवा विजेचा शॉक बसून ती विहिरीत पडली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | the deadbody of a 19 year old girl was found in a well a disturbing incident in pune

 

हे देखील वाचा :

MLA Devendra Bhuyar | तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या आमदारास 3 महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड

Coronavirus | कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

 

Related Posts