IMPIMP

Coronavirus | कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

by nagesh
coronavirus news modi government bans export covid 19 rapid antigen testing kit

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Coronavirus | देशात मे महिन्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची (Coronavirus) नोंद व्हायची. मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. सध्या नव्या बाधितांची संख्या ५० हजारांच्या आत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे. त्यामुळे मोदी सरकारने (Modi Government) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अंलबजावणीही त्वरित करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर मोठ्या संख्येने कोरोनाची चाचणी करावी लागेल. त्यामुळे चाचणीसाठी लागणारे किट देशातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१५ वर पोहोचली. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६४२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. ३ कोटी १४ लाख ११ हजार ९२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ८१ हजार ९४७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

 

Web Title : coronavirus news modi government bans export covid 19 rapid antigen testing kit

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लागू शकतो लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

 

Related Posts