IMPIMP

Pune Crime | कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s MCOCA action against 6 criminals of the infamous Nilesh Ghaiwal gang

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh
Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उगारला आहे. कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ
(Gangster Nilesh Ghaiwal) टोळीतील 6 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील (Pune Crime) कोथरुड
पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांनी आजपर्यंत 65 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टोळी प्रमुख मयुर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय-27 रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), ओंका उर्फ चिक्या शाम फाटक (वय-23 रा. माथवड चाळ, ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड), मनिष रामकृष्ण माथवड (वय-22 रा. गणेश कॉलनी, गणंजय सोसायटी, कोथरुड), गणेश सतीश राउत (वय-23 रा. नवएकता कॉलनी, हमराज मित्र मंडळासमोर, कोथरुड), समिर खेंगरे, रावण उर्फ तुषार पोळेकर यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(Pune Crime)

कुख्यात निलेश घायवळ टोळीतील सदस्य आणि टोळी प्रमुख राकेश कुंबरे आणि त्याच्या साथिदारांनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळी वर्चस्व व दहशत माजवण्यासाठी खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, विना परवाना शस्त्र बाळगणे,  दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आयुक्तांची 65 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.  शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 65 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade), पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी (PSI Ratikant Koli), प्रविण कुलकर्णी (PSI Pravin Kulkarni), पोलीस नाईक भास्कर बुचडे, पोलीस शिपाई अजय सावंत यांनी केली.

Web Title: Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s MCOCA action against 6 criminals of the infamous Nilesh Ghaiwal gang

हे देखील वाचा :

Rohit Pawar Vs Ram Shinde | कर्जत नगरपंचायत निवडणूक ! राष्ट्रवादीचा भाजपला झटका; रोहित पवारांचं वर्चस्व

Mystery Brain Disease | आणखी एका रहस्यमय आजाराची चाहूल, रूग्ण स्वत:वर ठेवू शकत नाही नियंत्रण; होऊ लागते विस्मरण

Ajit Pawar | ‘CM म्हणाले होते एकत्र लढू, पण…’, अजित पवारांनी सांगितलं नगरपंचायतींचे राजकारण

Related Posts