IMPIMP

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. पुण्यातील (Pune Crime) हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar police station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या भापकर टोळीच्या (Bhapkar Gang) म्होरक्यासह 3 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 54 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

टोळी प्रमुख आकाश दादासाहेब भापकर (वय-19 रा. कवडीपाट, हनुमान मंदिराजवळ, लोणी काळभोर,
ता. हवेली), योगीराज उर्फ भैय्या संदिप पानसरे (वय-21 रा. काळुबाई वसाहत, माळवाडी, हडपसर), अभिजीत संजय सावंत (वय-23 रा. शिवपार्क, पावर हाऊस, फुरसुंगी, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

आरोपींनी गाडी पुसण्यास कापड न दिल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्राच्या वडलांवर देखील आरोपींनी वार केले.
हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी मांजरी येथे घडला होता.
याप्रकरणी आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी तडीपार कालावधीत विनापरवाना शहरात वास्तव्य करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
आरोपींवर पुणे शहरातील इतर पोलीस ठाण्यात खंडणी, हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan) यांच्याकडे सादर केला.
या प्रस्तावाची पडताळणी करुन अपर पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate) करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आयुक्तांची 54 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 54 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे राजु अडागळे (Police Inspector Raju Adagale), दिगंबर शिंदे,
गोरख दरेकर, पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, प्रशांत नरसाळे, बाबासाहेब शिंदे, गिरीश एकोर्गे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta’s ‘moccasin’ action against Akash Bhapkar gang; MCOCA action on 54 gangs so far

 

हे देखील वाचा :

Pune Dam Water Level | पुण्याच्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 % भरली; 11 धरणे ‘ओव्हर फ्लो’

Gold Price Today | खुशखबर ! एक महिन्याच्या निच्चांकी स्तरावर सोन्याची किंमत, चांदीसुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या कात्रज घाटात प्रेम संबंधातून 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

 

Related Posts