IMPIMP

Rahul Dravid | राहुल द्रविडचा बचाव करत आर अश्विनने रवी शास्त्रींना दिले चोख प्रत्युतर; म्हणाला…..

by nagesh
Rahul Dravid | r ashwin defends coach rahul dravids criticism gives sharp reply to ravi shastri

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपनंतर (T-20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यातून ब्रेक घेतल्यावर रवी शास्त्री यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भारताचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाला आर अश्विन?
व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) न्यूझीलंड दौऱ्यासाठी पूर्णपणे वेगळा संघ का घेतला हे आर अश्विन आधी स्पष्ट केले. टी-20 विश्वचषकापूर्वी राहुल द्रविड आणि त्याच्या संघाने खूप मेहनत घेतली. मी हे म्हणू शकतो कारण मी ते खूप जवळून पाहिले आहे. प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक विरोधी संघासाठी त्यांनी योजना आखल्या होत्या. या लोकांनी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे खूप ऊर्जा खर्च केली आहे. अशा परिस्थितीत विश्रांतीची गरज कोणालाही भासू शकते, तशीच ती रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) द्रविड (Rahul Dravid) यांना ही भासली. न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर बांगलादेश (Bangladesh) दौऱ्याला सुरुवात होईल. त्या ठिकाणी राहुल द्रविड संघासोबत असणार आहे. म्हणून न्यूझीलंड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण वेगळ्या कोचिंग स्टाफसोबत गेले आहेत.”

 

रवी शास्त्री काय म्हणाले होते?
राहुल द्रविड यांनी नुकत्याच पार पडलेल्या टी- 20 विश्वचषकानंतर ब्रेक घेतला आहे.
यावर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जोरदार टीका केली.
“मी ब्रेकवर विश्वास ठेवत नाही कारण मला माझा संघ समजून घ्यायचा आहे, मला माझ्या खेळाडूंना जाणून घ्यायचे आहे
आणि त्याप्रमाणे नियोजन करून संघाच्या रणनीतीवर काम करायचे आहे.
मुख्य प्रशिक्षकाचे संघावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. हा ब्रेक घेण्याची गरज का आहे?
तुम्हाला आयपीएल (IPL) दरम्यान 2-3 महिने मिळतात त्यामुळे प्रशिक्षक म्हणून तुम्ही तिथे आराम करू शकता.
परंतु उर्वरित वेळेत प्रशिक्षक सर्व वेळ तयार असावा.” असे रवी शास्त्री म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rahul Dravid | r ashwin defends coach rahul dravids criticism gives sharp reply to ravi shastri

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

 

Related Posts