IMPIMP

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

by nagesh
Kantara OTT Release | after box office release kantara releasing ott

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Kantara OTT Release | साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट कांतारा (Kantara Movie) बॉक्स ऑफिसवर (Box
Office) धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि
दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कांतारा या सिनेमाला साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही मोठ्या प्रमाणात प्रेम आणि प्रतिसाद मिळाला. या
सिनेमाने हिंदीमध्येही खळबळ उडवून दिली आहे. (Kantara OTT Release)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 दिवस पूर्ण केले आहेत. बॉलिवूडमध्ये (Bollywood) 50 दिवस पूर्ण करणारा हा दक्षिणेतील पहिला सिनेमा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच बॉलिवूडचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांचेही मन जिंकले आहे. आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. कांतारा हा सिनेमा 24 नोव्हेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार असल्याचे समजत आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज होणार आहे.

 

सर्वाधिक कमाई करणारा 7 वा सिनेमा
रिषभ शेट्टीच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.27 कोटी रुपयांची कमाई करत हिंदीमध्ये संथ सुरुवात केली. त्यानंतर मात्र, सिनेमाच्या कमाईत दररोज वाढ होत गेली. या सिनेमाने 5 आठवड्यात 75 कोटींचा व्यवसाय केला आहे. कांतारा हा हिंदीत डब केलेला 7वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या अगोदर बाहुबली 2 (Bahubali 2), KGF 2, RRR, 2.O, बाहुबली (Bahubali) आणि पुष्पा (Pushpa) यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

 

Web Title :- Kantara OTT Release | after box office release kantara releasing ott

 

हे देखील वाचा :

MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | ‘सगळीकडे आपण आणि आपले कुटुंबीय हवेत अशी एकनाथ खडसे यांची भूमिका’ – मुक्तााईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Buldhana Police | दारुच्या नशेत पोलिसाचे पेट्रोलिंग, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 3 वाहनांना धडक; बुलढाण्यातील विचित्र अपघात

 

Related Posts