IMPIMP

Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल

by nagesh
pune crime | pune police crime branch arrest criminal

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मोटारसायकल घसरुन चालक खाली पडून जखमी झाला असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने (Pune Police Crime Branch) एका चोरट्याला अटक केली आहे.
ईश्वर दगडु भडकवाड (रा. जय मल्हार अपार्टमेंट, दांडेकर पुल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
हा प्रकार सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.

 

याप्रकरणी सागर नवघने (वय ३१, रा. श्रीनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे.
सागर नवघने हे मोटारसायकलवरुन जात असताना १० जून रोजी सायंकाळी त्यांची मोटारसायकल घसरुन ते पडले होते. ते पडलेले पाहून काही जण धावून आले.
त्यात ईश्वर भडकवाड याने ते खाली पडल्याचे पाहून त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारुन चोरुन नेला होता.

 

गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने आता ईश्वर भडकवाड याला पकडले.
त्याच्याकडे काही चोरीचे मोबाईल आढळून आले. त्या मोबाईल मालकाचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : pune crime | pune police crime branch arrest criminal

 

हे देखील वाचा :

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये, तर ‘या’ पध्दतीनं करा ‘क्लेम’, जाणून घ्या

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

 

Related Posts