IMPIMP

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्टल जप्त

by nagesh
Pune Crime News | Businessman fires at firecrackers in Kalyaninagar; After asking "Bhayya kaha ke ho", fired in anger, the youth smashed the car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) पुणे गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे 3 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) केसनंद – थेऊर रोडवर केली.

 

करवेंद्रसिंग राघवेंद्रसिंग चव्हण Karvendra Singh Raghavendra Singh Chavan (वय – 26 रा. मांजरी बुद्रुक, पुणे मुळ रा. पटेरा, जि. दमुह, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदारांना माहिती मिळाली की, केसनंद – थेऊर रोडवर एक व्यक्ती थांबला असून त्याच्या कमरेला पिस्टल आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी (Pune Police) 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कोठडी चौकशीमध्ये त्याने विक्रीसाठी आणखी दोन पिस्टल आणि 2 काडतुसे घरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून 60 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 3 पिस्टल, 3 काडतुसे असा एकूण 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Senior Police Inspector Ganesh Mane), पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, सुहास तांबेकर, ज्योती काळे यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests innkeeper carrying pistol without license 3 pistols seized

 

हे देखील वाचा :

Diabetes च्या रूग्णांनी शरीराच्या या भागातील जखमेकडे करू नये दुर्लक्ष, ताबडतोब करावा उपाय

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांनी EC पासून वाचण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा घेतला आधार, राज ठाकरेंपासून बंडखोरांपर्यंत सर्वांवर साधला निशाणा

दिसताच खरेदी करा ही हिरवी पाने, एक्सपर्टचा दावा – ही खाल्ल्याने लवकर कमी होईल Cholesterol-Blood Sugar

 

Related Posts