IMPIMP

Pune Crime | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुन्हेगारासह साथिदारांना गुन्हे शाखेने केली अटक, महाराष्ट्र-गोवा सीमेवर पोलिसांची कारवाई

by nagesh
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याप्रकरणी तडीपार गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखा युनिट चारच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात (Pune Crime) घेण्यात आले आहे. पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई महाराष्ट्र गोवा सीमेवरील दोडामार्ग परिसरात केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुधीर चंद्रकांत गवस Sudhir Chandrakant Gavas (वय-23 रा. जयप्रकाश नगर, येरवडा), रुपेश दिलीप अडागळे Rupesh Dilip Adagale (वय-24 रा. माऊली चौक, येरवडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) आयपीसी 307, 324, 504, 506, 34, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी आणि आरोपी सुधीर गवस यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी जयप्रकाश नगर येथून जात असताना आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केला. सुधीर गवस याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. तर इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपी महाराष्ट्र गोवा सीमेवरील (Maharashtra Goa Border) दोडामार्ग (Dodamarg) भागात पळून गेल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी सुधीर गवस याच्यावर तडीपारीची (Tadipaar) कारवाई करण्यात आली आहे.
त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपारी आदेशाचा भंग करुन त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मारहाण व चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल
आहेत. आरोपींना येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव
(API Vikas Jadhav), पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil),
पोलीस अंमलदार महेंद्र पवार, हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिंम, रमेश राठोड
यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch arrests Tadipar criminal along with accomplices for attempted murder, police action on Maharashtra-Goa border

 

हे देखील वाचा :

High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या

Pune News | देशातील 1200 सरपंच, अधिकार्‍यांची पिंपरी-चिंचवडला राष्ट्रीय कार्यशाळा

 

Related Posts