IMPIMP

Pune Crime | पावणे 10 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांना अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत (Laxmibai Nagri Sahakari Patsanstha) पावणे दहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने (EoW Pune) चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार (Rajendra Baburao Pawar) यांना अटक केली आहे. तसेच संचालकांवर एम पी आय डी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजित भोसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर ६ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबात अपर विशेष लेखापरिक्षक जे एस गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद २८०/२२) दिली आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार लेखा परिक्षण करण्यात आले.

 

त्यात लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेतच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी
संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरीता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा
दुरुपयोग करुन घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे संस्था अडचणीत येणार असून
ही बाब निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असताना सुद्धा कळविली नाही. तसेच नियंत्रक वैशाली पवार व
अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे.
दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे,
बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे
अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन ९ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परिक्षणातून
आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंदलकर
तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Rajendra Pawar, chairman of Lakshmibai Nagari Sahakari Patsanstha in Kothrud, arrested for embezzlement of Rs 10 crore, case registered against director

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | 42 लाख रूपयांचे लाच प्रकरण ! तत्का. तहसीलदार रंजना उमरहांडे, महसूल सहाय्यक स्वाती शिंदे, तलाठी सरफराज देशमुखसह 5 जणांवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई, जाणून घ्या प्रकरण

Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा अडचणीत?, हायकोर्टात याचिका दाखल

MNS Chief Raj Thackeray | ‘मी पुढची निवडणूक जिंकणार आणि…’, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य

 

Related Posts