IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील लोहगाव (Lohegaon Pune) परिसरामधील एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू (Died) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. प्रमोद रघुनाथ जाधव (Pramod Raghunath Jadhav) (वय 39) असे खून (Murder in Pune) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, पत्नी ज्योती जाधव (Jyoti Jadhav), सासु सुषमा दळवी (Sushma Dalvi), आणि मेहुणे राकेश दळवी (Rakesh Dalvi), कैलास दळवी (Kailas Dalvi) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर, मृत प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि 2 मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. (Pune Crime)

 

त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्रे घेण्यासाठी ज्योती जाधव या लोहगावमधील घरी आल्या होत्या.
यावेळी पुन्हा पती-पत्नी वाद झाला. त्यावेळी प्रमोदने पत्नीला बेदम मारहाण केली.
यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
रुग्णालयात ज्योती यांची आई आणि 2 मेहुणे आले होते.
त्यानंतर या सगळ्यांनी घरी जाऊन प्रमोद यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि निघून गेले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रमोद हा गेली दोन दिवस घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास विमानतळ पोलिस (Vimantal Police) करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | retired soldier murder by wife mother in law and brother in law

 

हे देखील वाचा :

Karuna Munde | ‘ते’ काम बंद करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार, करुणा धनंजय मुंडे यांची माहिती

Shani Gochar 2022 | काही दिवसातच शनीदेव उजळवणार ‘या’ 4 राशींचे नशीब, होईल फायदाच फायदा

ULIP मधून केलेल्या कमाईवर लागणार Tax, सर्क्युलर जारी

Karuna Munde | करुणा मुंडेंचा नवा गौप्यस्फोट, म्हणाल्या – ‘राज्यातील 2 मंत्र्यांच्या बायका आमच्या पक्षात येणार’

 

Related Posts