IMPIMP

Pune Crime | 2 कोटींची खंडणी उकळणार्‍या धनकवडीतील माहिती अधिकार (RTI) कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाकडून अटक; कात्रज परिसरात कारवाई

by nagesh
Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी (Royalty) भरली का अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल़ तर 2 कोटी रुपये द्यावे लागतील, नाही तर माहिती अधिकाराखाली (Right to Information) माहिती घेऊन कोर्टात दावा (Pune Crime) दाखल करु अशी धमकी (Threat) देणार्‍याला व खंडणी घेण्यासाठी आलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell, Pune) सापळा रचून पकडले. (Pune Police Crime Branch)

 

दत्तात्रय गुलाबराव फाळके Dattatraya Gulabrao Phalke (वय 46, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील 30 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फाळके हा माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist) म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या कंपनीचे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव (Adhagaon in Jamkhed Taluka of Ahmednagar District) येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करता त्याच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी पेमेंट केले का अशी विचारणा करुन तुमच्या कंपनीला दंडात्मक कारवाई (Punitive Action) करायची नसेल, व्यवस्थित काम करायचे असले तर तुम्हाला 2 कोटी रुपये द्यावे लागतील. नाही तर तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन 2 कोटी रुपयांची खंडणी (Demand Of Ransom) मागितली.

 

फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली.
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणार्‍या सातारा रोडवरील (Satara Road) कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला.
वर 2 हजार रुपयांची नोट ठेवून बाकी 1246 डमी नोटांचे 2 बंडल तयार करण्यात आले.
25 लाख रुपयांची बंडल देण्यासाठी तयार केले गेले. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता दत्तात्रय फाळके हा ही 25 लाखांची खंडणी घेण्यासाठी तेथे आला असताना पोलिसांनी त्याला पकडले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहाय्यक निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane), उपनिरीक्षक मोहन जाधव (PSI Mohan Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे,
प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदाबा भोजराव, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, प्रदिप गाडे,
चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Right to Information (RTI) activist arrested by pune police crime branch anti-extortion cell for extortion of Rs 2 crore; Action in Katraj area

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | 5 स्टार हॉटेलमध्ये बैठक ! 100 कोटी द्या, कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देतो; राहुल कुल यांच्यासह भाजपच्या 3 आमदारांना ऑफर देणाऱ्या चौघांना अटक

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले’ – रावसाहेब दानवे

Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

 

Related Posts