IMPIMP

Pune Crime | जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी; पुणे पोलिसांकडून महिलेला तमिळनाडूतून अटक

by nagesh
Woman Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरुन नेली होती.  या महिलेला वानवडी पोलिसांनी (wanwadi police) तमिळनाडु येथे जाऊन अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्यांच्या सुमारास घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते.
त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती.
तिने रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते.
त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते.
त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती.

 

Web Title : Pune Crime | Stealing from a meal with narcotics; Pune police arrest woman from Tamil Nadu

 

हे देखील वाचा :

14 सप्टेंबरपर्यंत SBI मध्ये करा स्पेशल डिपॉझिट, जास्त व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे; जाणून घ्या

Crime News | हनीट्रॅपद्वारे दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा; यवतमाळमधील एकास अटक

Jalgaon Crime | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्य सुत्रधाराला अटक

 

Related Posts