IMPIMP

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने ‘लाच’ देण्याचा प्रकार, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | Tehsildar of Haveli Tripti Kolte forcibly paid bribe of 50 thousand via G-Pay, find out the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पकलेला वाळूचा ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार यांना जबरदस्तीने ऑनलाईन लाच देण्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (Haveli Tehsildar Trupti Kolte) यांनी चोरीची वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. हा ट्रक सोडण्यासाठी ट्रक मालकाने कोलते यांच्या बँक खात्यात परस्पर 50 हजार जमा केले. याप्रकरणी कोलते यांनी पुण्यातील (Pune Crime) खडक पोलीस स्टेशन (Khadak Police Station) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau – ACB) जबरदस्तीने बेकायदा कामासाठी लाच (Bribe) देऊ केल्याची तक्रार केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तहसीलदार तृप्ती कोलते यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 16 टी 4100) दिसला.
तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला.
त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला. यानंतर कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला (Venkatesh Chiramulla) यांना फोन करुन याबाबत माहिती दिली.
तसेच तलाठी किंवा कोतवाल यांना पाठवण्यास सांगितले.

 

 

कोलते या ट्रक जवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत बसल्या होत्या.
त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपण गाडीचा मालक असल्याचे सांगत गाडी सोडण्याची विनंती केली. तसेच त्यांना पैशांचे आमिष देऊ लागला.
कोलते यांना त्याला स्पष्ट नकार देऊन करवाई करणार असल्याचे सांगितले.
काही वेळाने त्याठिकाणी कोतवाल तंगडे त्याठिकाणी आले.
त्यावेळी गाडीची तपासणी करुन पंचनामा करण्याच्या सूचना देऊन ट्रक कोतवालांच्या ताब्यात देऊन त्या कार्यालयाकडे निघाल्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रवासादरम्यान गाडीच्या मालकाने त्यांच्या गाडीचा पाठलाग करुन गाडी थांबवण्यासाठी खाणाखुणा केल्या. परंतु त्यांनी गाडी न थांबवता थेट तहसील कार्यालयात (Tehsil Office) गेल्या.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारस त्यांच्या मोबाइल फोनवर चार मिस कॉल आले.
परंतु त्या बैठकीत असल्याने त्यांनी फोन उचलले नाहीत. बैठक संपल्यानंतर कोलते यांनी कॉल केला.
त्यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचा बँक खात्याचा क्रमांक (Bank account number) मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे असल्याचे सांगितले.

 

 

कोलते यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला पैसे कशासाठी जमा करायचे आहेत अशी विचारणा केली.
त्यावर त्या व्यक्तीने तुम्ही जी वाळूची गाडी पकडली आहे.
त्या गाडी मालकाने तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितल्याची माहिती फोन करणाऱ्या
व्यक्तीने दिली.
हे ऐकताच कोलते यांनी त्या व्यक्तीला खडेबोल सुनावत तुम्ही मला लाच देत असल्याची तक्रार करणार असल्याचे सांगितले.

 

 

तहसील कार्यालयातील काम उरकून घरी जात असताना त्यांच्या चालकाने सांगितले की,
आज पकडलेल्या अनधिकृत वाळू वाहतूक (Unauthorized sand transportation)
करणाऱ्या मालक व काही लोक गाडी जवळ आहेत आणि तुमच्या सेव्हिंग खात्यावर 50 हजार
रुपये जमा केले आहेत.
कोलते यांनी बँक खाते तपासले असता सुरुवातील एक रुपया आणि त्यानंतर 50 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले.
हे पैसे अनोळखी व्यक्तीकडून गुगल पे (Google Pay) द्वारे सायंकाळी जमा केले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वाहन चालकाने ट्रक सोडण्यासाठी कोलते यांना बळजबरीने लाच देऊ केली असल्याने तहसीलदार
कोलते यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तसेच स्थानिक खडक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये घेण्याबाबत कळविले.

 

Web Title : Pune Crime | Tehsildar of Haveli Tripti Kolte forcibly paid bribe of 50 thousand via G-Pay, find out the case

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात ‘अज्ञात’ मर्सिडीज कार घुसली, चालकास अटक

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 4000 रुपये, परंतु 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

SBI नं जारी केला अलर्ट ! 15 सप्टेंबर रोजी 2 तासांसाठी बंद राहणार बँकिंग सेवा, व्यवहारांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळ

 

Related Posts