IMPIMP

Pune Crime | महिलेला कामावरुन काढून टाकल्याने झालेली तक्रार मिटविण्यासाठी मुलाने मालकाकडे मागितली 10 लाखांची खंडणी; कात्रज परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Crime of extortion against a moneylender; FIR against Shubham Jadhav and Ashish (Ashok) Gaikwad at Chandannagar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कंपनीमध्ये वारंवार तक्रारी येत असल्याने मालकांनी एका महिलेला कामावरुन काढून टाकले. याचा
राग येऊन तिच्या मुलाने कंपनीतील दोघा भागीदारांना मारहाण केली. या गुन्ह्यांमध्ये आपल्याला ४ लाख रुपये खर्च आला, असे सांगून त्याने कंपनीच्या
मालकाकडे १० लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी रामनाथ नारायण खमीतकर (वय ६४, रा. कदम प्लाझा, भारती विद्यापीठासमोर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti
Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर मुकुंद अहिरराव
Sagar Mukund Ahirrao (वय २६, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा – Laxmi Nagar, Kondhwa) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ मे रोजी
घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खमीतकर यांची इलेक्ट्रिकल मोटार बनवण्याची अ‍ॅड्राईड सिस्टिम नावाची उंड्री पिसोळी येथे कंपनी आहे.
या कंपनीमध्ये सरिता अहिरराव नावाची महिला कामाला होती.
ती कामावरील इतर महिलांशी वारंवार भांडणे करत होती. तिच्याबाबत फिर्यादी व त्यांच्या भागीदारांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांनी कंपनी कायद्यानुसार तिला कामावरुन काढून टाकले होते. त्यानंतर तिचा मुलगा सागर अहिरराव व त्यांच्या साथीदारांनी कंपनीमध्ये जाऊन त्यांचा भागीदार श्रीधर नायडु यांच्यावर हल्ला करुन कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले. तसेच कंपनीतील काचा फोडून नुकसान केले होते. तसेच तुझा पार्टनर रामनाथ खमीतकर याला सुद्धा सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा १० जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करुन सागर अहिरराव व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.

 

त्यानंतर खमीतकर हे ५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी दुचाकीवरुन कामाच्या ठिकाणी जात असताना राजस सोसायटीजवळ सागर अहिरराव व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात धारदार हत्याने मारुन जखमी केले होते.
भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खमीतकर यांना १४ मे रोजी सागर याने फोन केला.
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात माझा ४ लाख रुपये खर्च झाला आहे.
ते प्रकरण आणि आता भारती विद्यापीठाचे दाखल गुन्ह्याचे देखील मिटवायचे आहे.
तर मला तुम्ही १० लाख रुपये द्यावे लागतील. मला पैसे दिले तर तुम्हाला आम्ही काही करणार नाही.
पैसे दिले नाही तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर ५ जून रोजी रात्री पुन्हा सागर याने फोन करुन तुम्हाला वाढवायचे की मिटवायचे असे म्हणाला.
त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती त्यांचे भागीदार श्रीधर नायडु यांना सांगितले.
त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | The child demanded a ransom of Rs 10 lakh from the employer to clear the complaint of dismissal of the woman Incidents in Katraj area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पर्वती पायथा येथे कोयते हवेत नाचवत दहशत ! गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीमध्ये ‘गँगवॉर’? 12 हून अधिक वाहनांची तोडफोड

Modi Government | मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा ! 14 पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ; कोणत्या पिकाला किती हमीभाव ? जाणून घ्या

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

 

Related Posts