IMPIMP

Pune Crime | ससूनमधील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे मागण्याचा प्रकार

by nagesh
Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मी ससूनमधून सी एम ओ (Chief Medical Officer Sasoon Hospital) बोलत आहे. तुमच्या रुग्णाच्या उपचारासाठी अर्जंट औषधांची गरज आहे मी ते औषध खरेदी करतो त्यासाठी दिलेल्या क्रमांकावर तातडीने पैसे पाठवा, असे सांगून रुग्णांच्या फसवणूकीचा (Cheating Case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी ससून रुग्णालयाचे सी एम ओ डॉ. पराग वराडे (Sasoon Hospital CMO Dr Parag Warade) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२८/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा प्रकार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून २२ ऑगस्ट दरम्यान ससून रुग्णालयात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ससून रुग्णालयात सी एम ओ म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या नावाने ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना फोन करुन मी डॉ. पराग बोलतोय, असे सांगून त्यांना ६ हजार ३०० रुपये पाठविण्यास सांगितले.
तसेच आणखी एका महिला रुग्णांना फोन करुन औषधोपचार खर्चापोटी ६ ते ७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
तसेच रुग्णालयातील कर्मचार्‍यांची बदली न करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकार लक्षात आल्यावर ससून रुग्णालयाच्या वतीने फिर्याद दिली असून बंडगार्डन पोलिसांनी दोघा मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The name of the doctor in Sassoon demanded money from the patients relatives

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक

Pune News | पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानीपोटी 3.67 कोटींच्या अनुदानाची मागणी

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts