IMPIMP

Pune Crime | दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल, अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापून हातात कोयता घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Pune Police Crime Branch) ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.14) लोहियानगर (Lohia Nagar, Pune) येथे (Pune Crime) करण्यात आली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना लोहियानगर भागातील पी. एम. सी. कॉलनी नं. 9 येथे वाढदिवसाचा केक (Birthday Cake) कोयत्याने कापून डीजे लावून नाचण्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने लोहियानगर येथे पंचासमक्ष छापा टाकून एका विधिसंघर्षीत मुलाला ताब्यात घेऊन 500 रुपयांचा कोयता जप्त केला. अल्पवयीन मुलावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) आर्म ॲक्टअंतर्गत (Arm Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

सध्या गुन्हेगार आणि तरुणांमध्ये मध्यरात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार सुरु आहेत. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयता यासारख्या हत्यारांचा वापर करुन कापले जात आहेत. तसेच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | The video went viral on social media cutting the cake with a scythe to create panic Pune Police Detain one boy

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dattatray Bharne | राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

Gold Price Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, सोनं पुन्हा 50 हजारांवर, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

 

Related Posts