IMPIMP

Pune Crime | नो एंट्रीतून आल्याने अडविल्याने मारहाण करुन विनयभंगाची तक्रार देण्याची वाहतूक पोलिसाला दिली धमकी

by nagesh
Pune Crime | threatened the pune traffic police to beat him up and file a molestation complaint as he was stopped by the no entry route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | नो एंट्रीतून (No Entry) आल्याने ऑनलाईन दंड केल्याने चिडलेल्या महिलेने साथीदारांना बोलवले. त्यांनी वाहतूक पोलिसाला (Traffic Police) मारहाण (Beating) करुन तु आमची तक्रार केल्यास तुझ्याविरुद्ध विनयभंगाची (Molestation) तक्रार करु, अशी धमकी (Threat) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी विश्रामबाग वाहतूक पोलीस विभागातील (Vishram Bagh Traffic Police Department) पोलीस शिपाई संपत करवंदे (Sampat Karwande) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११९/२२) दिली असून त्यानुसार पोलिसांनी रोहन बाबासाहेब जावळे Rohan Babasaheb Jawle (वय २७) आणि प्रेम यशवंत राऊत Prem Yashwant Raut (वय २०, दोघे रा. शिवाजीनगर) यांना अटक (Arrest) केली आहे. सृष्टी यशवंत राऊत (Srishti Yashwant Raut) आणि आजी शशिकला अशोक राऊत Sasikala Ashok Raut (रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार अलका टॉकिजजवळील टिळक चौकात गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टिळक चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते.
केळकर रोडवरुन टिळक चौकात येण्यास बंदी आहे. असे असतानाही सृष्टी राऊत या नो एंट्रीतून टिळक चौकात आल्या.
त्यांना फिर्यादी यांनी अडविले असताना त्यांनी फिर्यादीशी वाद घातला.
तेव्हा त्यांनी त्यांच्या वाहनावर लायसन्स जवळ न बाळगल्याचा ऑनलाईन दंड (Online Penalty) टाकून त्यांना जाऊ दिले.
त्यानंतर सृष्टी राऊत या रोहन जावळे, प्रेम राऊत व शशिकला राऊत यांना घेऊन तेथे आल्या.
या तिघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. शिवीगाळ करुन त्यांचे शर्ट ओढून शासकीय कामात अडथळा आणला. सृष्टी व रोहन जावळे यांनी फिर्यादी यांना तू जर आमच्याविरुद्ध तक्रार दिली तर माझी बायको पण तुझ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देईन, अशी धमकी दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कुंभारे (Police Sub-Inspector Kumbhare) तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Pune Crime | threatened the pune traffic police to beat him up and file a molestation complaint as he was stopped by the no entry route

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | दहीहंडीच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या तुमच्या शहरातील Gold चे दर

Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

Devendra Fadnavis | रायगडमध्ये सापडलेली ‘ती’ संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

 

Related Posts