IMPIMP

Devendra Fadnavis | रायगडमध्ये सापडलेली ‘ती’ संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

by nagesh
Devendra Fadnavis | 111 candidates will also be appointed through mpsc announces deputy cm devendra fadnavis in vidhan sabha

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटातील (Chain Bomb Explosion) स्फोटके (Explosives) रायगड जिल्ह्यातील (Raigad District) श्रीवर्धनच्या शेखाडी बंदरात (Shekhadi Port) उतरवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा श्रीवर्धन आणि भरडखोलमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्याने आणि या बोटींमध्ये एके-47सह काही शस्त्रास्त्रे सापडल्याने (AK-47 Weapons Found) खळबळ उडाली असून राज्यात हाय अलर्ट (High Alert) जारी केला आहे. या संदर्भात आज विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली. रायगडच्या समुद्र किनार्‍याला लागलेली बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या (Australian women) मालकीची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानंतर हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. या बोटीचे नाव ईडीहार्ट असून, ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. या महिलेचा पती स्वत: या बोटीचा कप्तान आहे. तो ही बोट मस्कतहून युरोपकडे (Europe) नेत होता. 26 जून रोजी सकाळी या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला.

 

दुपारी एका कोरियन युद्धनौकेने (Korean Warships) या खलाशांची सुटका करून त्यांना ओमानकडे सुपुर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने इडिहार्ड या नौकेचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनार्‍याला लागली, अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून (Indian Coast Guard) देण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले. या घटनेमुळे महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.

 

या संशयास्पद बोटी आढळल्यानंतर राज्यात समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यात त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कॉम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) सुरू केले आहे. पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र एटीएसचे (Maharashtra ATS) प्रमुख रायगडला रवाना झाले आहेत.
राज्याची गुप्तचर यंत्रणा केंद्राशी समन्वय साधत आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis gave important information about the suspicious boat found in raigad

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या वडिलांचा अल्पवयीन मुलांच्या हल्ल्यात मृत्यू

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांनी दिली माहिती, जवळच्या मित्राने सांगितली स्थिती

Dahi Handi-2022 | दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, गोविंदांना असा होईल फायदा

 

Related Posts