IMPIMP

Pune Crime | चेंबर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू, वाघोली परीसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Unfortunate death of three workers who came down to clean the chamber due to suffocation, incident in Wagholi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वाघोली येथील मोझे कॉलेज रस्त्यावरील एका सोसायटीचे चेंबर साफ करण्यासाठी उतरलेले तिघे कामगार अडकले असून त्यात श्वासोश्वास घेता न आल्याने दोघांचा मृत्यू (Death) झाला. तर तिसर्‍याचा शोध सुरु आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पीएमआरडीए अग्निशामन दलाचे (PMRDA Fire Brigade) जवान या तिसर्‍या कर्मचार्‍याचा शोध घेतला जात आहे. ही घटना वाघोली येथील सोलासिया सोसायटीमध्ये (Solasia Society) आज सकाळी ७ वाजता घडली.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलासिया सोसायटीने चेंबर साफ करायचे काम कंत्राटी कामगारांना दिले होते. चेंबर साधारण १० फुट खोल आहे. मात्र, मैला पाण्यामुळे आत मिथेन गॅस तयार होत असतो. कामगार खाली उतरल्यावर या वायूमुळे कामगारांना श्वास घेण्यास अडथळा येतो. श्वास घेता न आल्याने अगोदर चक्कर येते. माणुस बेशुद्ध होतो. वेळीच मदत न मिळाल्यास त्यांचा मृत्यु होतो. या घटनेतही बहुदा असेच घडले. (Pune Crime)

 

एक कामगार चेंबरमध्ये उतरल्यानंतर त्याला चक्कर आल्याने त्याच्या मदतीला दुसरा खाली उतरला.
त्यालाही त्रास होऊ लागल्याने तिसरा आत गेला व तिघेही अडकले.
अग्निशामन दलाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने मदत करीत दोघांना बाहेर काढले.
परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. नितीन प्रभाकर गौड Nitin Prabhakar Goud (वय ४५),
गणेश भालेराव Ganesh Bhalerao (वय २८), सतीशकुमार चौधरी Satish Kumar Chaudhary
(वय ३५, रा. वाघोली) अशी या तिघांची नावे आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, नितीन माने, संदीप शेळके,
चेतन खमसे, मयूर गोसावी, तेजस डांगरे, विकास पालवे, अभिजीत दराडे, अक्षय बागल हे तात्काळ घटनास्थळी
रवाना होऊन अथक प्रयत्नानंतर तीन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Unfortunate death of three workers who came down to clean the chamber due to suffocation, incident in Wagholi area

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांच्यातील मतभेदामुळे पदस्थापनेत 19 SP, डीसीपींना (DCP) फटका?, राज्य पोलीस दलात चर्चा

Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

Shivsena MP Arvind Sawant | अरविंद सावंतांचा फडणवीसांना सवाल, म्हणाले – ‘पुण्यात तुमचा कंट्रोल नसतो मग मुंबईत कुणाचा असतो? तेव्हा का तमाशा…’

 

Related Posts