IMPIMP

Maharashtra IPS Transfer | मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांच्यातील मतभेदामुळे पदस्थापनेत 19 SP, डीसीपींना (DCP) फटका?, राज्य पोलीस दलात चर्चा

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 19 SPs, DCPs hit in posting due to differences between Chief Minister, Deputy Chief Minister?, Discussion in Maharashtra Police Force

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील २५ पोलीस अधीक्षक (Superintendent Of Police) तसेच पोलीस उपायुक्तांना (Deputy Commissioner Of Police) विविध ठिकाणी बदल्या करुन अखेर राज्य सरकारने या पोलीस अधिकार्‍यांना दिवाळीचे गिफ्ट दिले. दुसरीकडे तब्बल 19 SP / डीसीपींच्या (DCP) बदली केल्यानंतरही त्यांची कोठेही पदस्थापना न करता त्यांना दिवाळीच्या तोंडावर जोरदार झटका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांच्यात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरुन मतभेद असल्यामुळेच राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना वेटिंगवर (Senior Police Officers Are On Waiting) रहावे लागत असल्याची पोलीस दलात चर्चा आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस दलात ज्याला साईड पोस्टिंग (Side Posting In Maharashtra Police) म्हटले जाते, अशा पोलीस अकादमी, एसआरपीएफ (SRPF), गुप्तवार्ता (SID), लाच लुचपत प्रतिबंधक (ACB) अशा विभागातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आल्या. मात्र, या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर असलेल्या बहुतांश अधीक्षकांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या (MVA Govt) कार्यकाळात जे अधिकारी साईड पोस्टिंगला गेले होते. त्यांना या सरकारने पुन्हा मुख्य प्रवाहात आणले आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

राज्यातील चार दोन अधिकार्‍यांचा अपवाद वगळता अनेक ठिकाणच्या पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांचा त्या ठिकाणचा सेवा काळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे तेथून बदलून जाताना दुसर्‍या ठिकाणी क्रीम पोस्ट मिळावी, यासाठी अनेकांनी मे महिन्यांपासून जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यासाठी आवश्यक त्या सर्व ‘उपाय योजना’ही केल्या होत्या. त्याचवेळी पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा बातम्या येत होत्या. तसेच काही केंद्रीय एजन्सीजही या अधिकार्‍यांच्या बदल्यांवर नजर ठेवून होत्या. त्यामुळे ठाकरे सरकारच्या (Thackeray Govt) काळात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची तारीख सातत्याने पुढे ढकलल्या जात होत्या. त्यानंतर अचानक सरकार बदलले.

 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. युतीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडेच गृहमंत्रीपद होते. आताही त्यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी साईड पोस्टिंगला
गेलेल्या बहुतांश अधिकार्‍यांची पुन्हा जिल्हा अधीक्षकपदी पदस्थापना झाली.
मात्र, त्याचवेळी अनेक जिल्हा अधीक्षकांना नेमकी कोठे पोस्टिंग द्यावी, यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
यांच्यात एकमत न झाल्याने त्यांना वेटिंगवर रहावे लागले असल्याची चर्चा आहे.
त्यातील बहुतांश पोलीस अधीक्षकांची गेल्या 2 वर्षातील ‘कामगिरी’ चांगली आहे.
तरीही त्यांना वेटिंगवर रहावे लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, काही ठिकाणच्या अधिकार्‍यांना एकाच ठिकाणी 3 वर्ष पुर्ण झाले आहे.
किंबहुना 3 वर्षापेक्षाही अधिक काळ झाला आहे असे काही बोटावर मोजण्याइतके अधिकारी आहेत.
अशा अधिकार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्या आस्थापना अत्यंत महत्वाच्या आहेत.

 

 

Web Title :-  Maharashtra IPS Transfer | 19 SPs, DCPs hit in posting due to differences between Chief Minister, Deputy Chief Minister?, Discussion in Maharashtra Police Force

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

Shivsena MP Arvind Sawant | अरविंद सावंतांचा फडणवीसांना सवाल, म्हणाले – ‘पुण्यात तुमचा कंट्रोल नसतो मग मुंबईत कुणाचा असतो? तेव्हा का तमाशा…’

Uddhav Thackeray | भिडे यांच्याबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिली नवीन माहिती

 

Related Posts