IMPIMP

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांची नवी शक्कल ! मोबाईल पाठवून त्यातील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून साडेसात लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime | A new face of cyber thieves; Sending a mobile and asking to fill in the information in the app Fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Cyber Crime | नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर चोरटे (Cyber Thief) नव्या नव्या शक्कल शोधून काढत असतात. त्यातून विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे (Bank Account Empty) करीत असतात. आता सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) नवी शक्कल अवलंबिली आहे. एका तरुणाला त्यांनी मोबाईल पाठवून त्यात सीम कार्ड टाकण्यास सांगितले. मोबाईलमधील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून त्याच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी बालेवाडी (Balewadi) येथे राहणार्‍या एका ४३ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साधु नटवरभाई गोविंदभाई Sadhu Natvarbhai Govindbhai (रा. अहमदाबाद-Ahmedabad), रेश्मा मनोहर सरवदे Reshma Manohar Sarvade (रा. वडवणी, जि. बीड – Beed) वापरकर्ता प्रदीप कैलास नरवडे (Pradeep Kailas Narwade) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान घडला. (Pune Cyber Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना साधु नटवरभाई यांचा मोबाईलवर फोन आला. त्यांनी सिटी बँकेचे क्रेडीट कार्डची (Citibank Credit Card) मुदत संपत आली असून त्या बदल्यात त्यांना सीटी बँक डायर्नस क्लब इंटरनॅशनल कार्ड (Citi Bank Dairy’s Club International Card) मिळणार आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना रेडमी कंपनीचा मोबाईल पाठविला. त्यामध्ये त्यांना त्यांचे सीमकार्ड टाकायला सांगितले. मोबाईलमध्ये असलेल्या डॉट सिक्युअर अ‍ॅपमध्ये (Dot Secure App) फिर्यादी यांचा मोबाईल नंबर टाकण्यास सांगून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर सायबर चोरट्यांनी ११ वेळा ट्रान्झेक्शन करुन त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर करुन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली. फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) याची तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन सायबर चोरट्यांची नावे निष्पन्न केली असून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड (Police Inspector Dada Gaikwad) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | A new face of cyber thieves; Sending a mobile and asking to fill in the information in the app Fraud

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात MBBS ला अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने वकिल महिलेकडून 8 लाखांची फसवणूक

Devendra Fadnavis | पंकजा मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

Pune PMC News | क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा व्यवसायांवर लक्ष ठेवावे; अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची सूचना

Pune PMC News | पुणे महापालिका मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर आणि कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर झाले सह महापालिका आयुक्त

 

Related Posts