IMPIMP

Pune Koregaon Park Crime | सुरक्षारक्षकाला तलवारीचा धाक दाखवून चंदनाच्या झाडाची चोरी, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | सुरक्षारक्षकाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन चंदनाच्या झाडाची चोरी करुन नेले (Sandalwood Trees Theft) . हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरातील एकांतिका अपार्टमेंटमध्ये सोमवारी (दि.18) पहाटे तीन ते पावणे चार दरम्यान घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Koregaon Park Crime)

याबाबत राजाराम नारायण बोडू (वय-57 रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात सहा जणांवर आयपीसी 395 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकांतिका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास सहा आरोपी गोवर्धन सोसायटी मधून बेकायदेशीररित्या फिर्यादी काम करत असलेल्या अपार्टमेंटमध्ये आले.

आरोपींनी फिर्यादी यांना तलवारीचा धाक दाखवला. तसेच आरडा ओरडा केला तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. आरोपींनी अपार्टमेंटच्या आवारात असलेले 15 हजार रुपयांचे चंदनाचे झाड कापून चोरून नेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (API Dattatraya Ligade) करीत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर कटरने वार

पुणे : जुन्या वादातून एका तरुणाच्या डोक्यावर कटरने वार करुन गंभीर जखमी केले. (Attempt To Kill) हा प्रकार
रविवारी (दि.17) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेत घडला आहे.
याबाबत ओम राजु नवले (वय-19 रा. गणेश पेठ, पुणे) याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station)
फिर्य़ाद दिली. यावरुन कौशिक रेड्डी (वय-21 रा. केशवनगर, मुंढवा), वेदांत नायडू (वय-20 रा. कसबा पेठ) यांच्यावर
आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखळ केला आहे.

ओम नवले त्याच्या घराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचे आरोपी यांनी जुन्या भांडणाच्या रागातून ओम याच्या डोक्यात लोखंडी कटरने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडण सुरु असताना ओमचे मामा मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Amit Shah On Uddhav Thackeray | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान, ”महाराष्ट्रासमोर CAA वर भूमिका स्पष्ट करा”

Related Posts