IMPIMP

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाचवी उत्तीर्ण शिपायांची ‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती?

by sachinsitapure

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुक रंगात येउ लागली आहे. राजकिय पक्षांसोबतच प्रशासकीय यंत्रणाही तयारीसाठी वेगाने धावू लागली आहे. निवडणुक यंत्रणेसाठी प्रशासनाला मनुष्यबळाची प्रचंड कमतरता भासत असून मतदार याद्या पुनरिक्षणासारख्या कामांसाठी चक्क जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतलेल्या ‘शिपायांना’ देखिल बीएलओ Booth Level Officer (BLO) म्हणून नेमण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे निवडणुक यंत्रणा खरच पारदर्शक आहे? असाही प्रश्‍न उपस्थित होउ लागला आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुक विभागाच्यावतीने छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनिरक्षण मोहीमेसाठी मतदान केंद्र स्तरावर बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रामुख्याने बीएलओचे काम हे लिपिक व त्यावरील पदांवर काम करणार्‍या शासकिय कर्मचारी, शिक्षकांकडे सोपविण्यात येते. पुणे शहरात प्रामुख्याने हे काम महापालिका आणि शिक्षण मंडळाकडील कर्मचार्‍यांकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक अधिकार्‍यांनी नुकतेच शहरातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये कर्मचार्‍यांच्या पदाचा आणि शिक्षणाची कुठलिही माहिती न घेताच शिपाई,बिगारी दर्जाच्या कर्मचार्‍यांना बीएलओ नियुक्तीची ऑर्डर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शिपाई आणि बिगारी पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी शिक्षणाची अट शिथील आहे. त्यामुळे या पदावर अगदी पाचवी उत्तीर्णपासून दहावी नापास पर्यंतचे अनेक कर्मचारी आहेत. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत त्यांना मतदान केंद्रातील साधारण एक हजार ते बाराशे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मतदार यादीतील नाव, पत्ता, फोटो आदींची तपासणी करून काही त्रुटी अथवा चुका असतील तर त्या दुरूस्त करायच्या आहेत. हे काम फिल्डसोबतच संगणकावरही करावे लागणार आहे. दुसरीकडे लिपिक पदावर काम करणार्‍या अनेकांना बीएलओ म्हणून नियुक्त केलेले नाही, अशी जोरदार चर्चा महापालिका कर्मचार्‍यांमध्ये Pune Municipal Corporation (PMC) सुरू झाली आहे.

Pune Pimpri Chindhwad Crime | पिंपरी : रंग लावण्यावरून वाद, घरात घुसून तरुणावर कोयत्याने वार

Related Posts