IMPIMP

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी पुण्यात काॅंग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर

by sachinsitapure

पुणे :  – Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी काॅंग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुणे येथून कसबा विधानसभेचे कॉग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(Pune Lok Sabha Election 2024)

सोलापूर लोकसभा उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर येथून प्रतिभा धानोरकर गडचिरोलीतून नामदेव किरसंड अमरावती येथून बळवंत वानखेडे, कोल्हापूर येथून शाहू छत्रपती, नंदूरबार येथून गोपाळ पडवी तर नागपूर येथून विकास ठाकरे, अशा महाराष्ट्रातील एकूण सात नावावर आज दिल्ली येथे शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर केली‌.(Pune Lok Sabha Election 2024)

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.
पण आता काँग्रेसच्या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

Related Posts