IMPIMP

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीतील 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय; नगरविकास मंत्र्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

by nagesh
Pune News | pune and pimpri chinchwad minister eknath shinde reviews various development works in pune and pimpri chinchwad municipal corporation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PMC and Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीमधील गुंठेवारीची (Gunthewari) प्रकरणे नियमित करण्यासंदर्भात नगरविकास विभागाने (Urban Development Department) निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. पुणे (Pune News) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीमधील विविध विकासकामांचा (various development works) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिगृह येथे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आढावा बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe),
राज्यसभा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील (Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil),
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले इत्यादी उपस्थित होते.

 

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील विविध विकास कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश (Instructions) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले.

 

 

31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित

राज्य सरकारने (State Government) 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या नियमांची अंमलबजावणी अद्याप सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात राज्य शासनाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते.
त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी.
तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकाला गुंठेवारी नियमित करायची इच्छा असेल तर त्यासंदर्भात सकारात्म कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रिक्त पदे भरण्यास परवानगी

पुणे महापालिकेमध्ये नव्याने गावांचा समावेश झाल्याने पुणे महापालिकेची हद्दवाढ झाली आहे.
यानंतर पुणे महापालिकेतील रिक्त पदे (Vacancies) भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून या रिक्त पदांच्या अकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत.

 

 

24 पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा (24 hour water supply) करण्यासाठी सुरु करण्यात आलेली अमृत योजना (Amrit Yojana) अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समोर आले आहे.
शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी अमृत योजनेला गती देण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत.
याशिवाय ही योजना पूर्ण होईपर्यंत शहरातील एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमीत करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title : Pune News | pune and pimpri chinchwad minister eknath shinde reviews various development works in pune and pimpri chinchwad municipal corporation

 

हे देखील वाचा :

Solapur News | धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गर्भवती बायकोचा गळा दाबून पोटावर मारली लाथ

Pune News | चंद्रकांत पाटील यांच्या नावावर जमीन बळकावण्याचा प्रयत्न; वनखात्यामुळे प्रकरण उघडकीस, जागेची किंमत 200 कोटी

Gold Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदीच्या दरात ‘तेजी’, जाणुन घ्या

 

Related Posts