IMPIMP

Pune News | पुण्यातील विद्यार्थ्यांनी तयार केली भारतातील पहिली चालकरहित इलेक्ट्रिक कार

by nagesh
Pune News | Students in Pune build India’s first driverless electric car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिर्टीच्या (MIT World Peace University) यंत्र अभियांत्रिक (Mechanical Engineering) आणि अणुविद्युत आणि दूरसंचार या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी भारतातील पहिली चालकरहित इलेक्ट्रिक चारचाकी गाडी (driverless electric car) तयार केली आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थांनी चालक विरहित, स्वायत्त, विद्युत, चारचाकी आणि चार आसनी बोल्ट – ऑन ऑटोनॉमस व्हेइकलचे (Bolt – On Autonomous Vehicle) प्रात्यक्षिक दाखविले.(Pune News)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वाहनांना अधिकाधिक अद्ययावत बनविण्यासाठी अभियंते प्रयत्नशील आहेत, याचे पुढचे स्वरूप म्हणजे
स्वायत्त, चालक विरहित वाहन ज्यावर टेस्ला आणि गूगल या कंपन्या काम करत आहेत. या इलेक्ट्रिक
कारमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे मानवी
चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर
आधारित असून त्यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला उर्जा देण्यासाठी
लिथियम आर्यन बॅटरी वापरण्यात आली आहे, असे यश केसकर या विद्यार्थ्याने सांगितले.

 

या वाहनाच्या तीन उपप्रणालींवर नियंत्रण केले गेले आहे जे थ्रॉटल, ब्रेक आणि स्टीयरिंग आहेत. लिडर
कॅमेरे, मायक्रोप्रोसेसर, स्वयंचलित क्रिया नियंत्रित करणारी यंत्रणा आणि विविध सेन्सर्ससह अनेक एआय
आणि एमएल अल्गोरिदम वापरून स्टीयरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, असे
सुधांशू मणेरीकर या विद्यार्थ्याने सांगितले. ह्या वाहनांची पावर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंगसाठी चार
तासांचा वेळ लागतो, ज्यात चाळीस किलोमीटर प्रवास केला केला जाऊ शकतो. अशाप्रकारच्या वाहनांचे
शेती, खाण, वाहतूक क्षेत्र इत्यादींमध्ये उपयोग होऊ शकतो, असे सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे यांनी सांगितले.

 

प्रा. प्रकाश जोशी म्हणाले, चालक विरहित स्वायत्त वाहन विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून सादर करण्याची ही
पहिलीच वेळ आहे. पुणे स्मार्ट सिटी आणि मेट्रो व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांनी या वाहनाची पाहणी करुन
याचा पुणेकरांच्या सेवेसाठी उपयोग होईल, असे सांगितले़ प्रा. डॉ. गणेश काकांडीकर म्हणाले, अशा
प्रकारच्या विद्युत वाहनांचा उपयोग मेट्रो स्थानकांना संलग्नित क्षेत्राशी जोडण्यासाठी, दळणवळणाकरिता, एअरपोर्ट, गोल्फ क्लब, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी करता येईल.

 

या प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रा. श्रीकांत यादव आणि प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड,
कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी. राव व इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद
खांडेकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Pune News | Students in Pune build India’s first driverless electric car

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Nashik | 8 लाखाच्या लाच प्रकरणात ZP च्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार?

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

 

Related Posts