IMPIMP

Pune Pimpri Crime | पिंपरीत Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 14 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Another Major Bitcoin Fraud Case Revealed FIR against 7 persons including Satish Kumbhani of Bitconnect in 42 crore fraud case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | बिटकॉईनमध्ये गुंतवणूक (Bitcoin Investment) केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून 13 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 8 एप्रिल ते 3 मे या कालावधीत यमुनानगर निगडी (Yamunanagar Nigdi) येथे घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

याबाबत राकेश ईश्वरदास लोहार Rakesh Ishwardas Lohar (वय – 38 रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) सोमवारी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. आरोपींनी बिटकॉइन मध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे फिर्यादी यांना सांगितले. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली.
या लिंकद्वारे फिर्यादी यांनी आपली वैयक्तिक माहिती भरत बायकॉईन हे अ‍ॅप (Bycoin App) डाऊनलोड केले.
या अ‍ॅपद्वारे फिर्यादी यांनी तब्बल 13 लाख 67 हजार रुपये भरले. परंतु त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस अंमलदार विश्वजित खुळे (Vishwajit Khule) करीत आहेत.

 

Web Title : – Pune Pimpri Crime | 14 lakhs fraud in Pimpri on the pretext of investment in Bitcoin

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, खुले होताच कोसळले ‘हे’ स्टॉक्स

Bank Jobs 2022 | बँकांमध्ये 6000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Pune PMC News | मुंढव्यातील गोठेधारकांना जागा वाटप करण्यास तूर्तास स्थगिती – मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे

Related Posts