IMPIMP

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्त्ता ऑनलाइन भांडण सोडवण्यासाठी गेलेल्यांना विट मारुन जखमी केले. तसेच त्याठिकाणी जमलेल्या लोकांना शिवागाळ करुन हत्यारे उगारुन दहशत पसरवणाऱ्या गणेश उर्फ गुड्या अनिल पटेकर व त्याच्या इतर 6 साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. चालु वर्षातील पुणे पोलिसांची ही 16 वी मोक्का कारवाई आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) 326, 143, 147, 149, 336, 323, 504, 506, 427 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात अमरजित मुन्ना सिंग (वय-23), रोहन अनिल चव्हाण (वय-25), शुमवेल उर्फ दाद्या बाबुराव गायकवाड (वय-30 तिघे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमूख गणेश उर्फ गुड्या अनिल पटेकर याच्यासह इतर चार जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टोळी प्रमुख गणेश पटेकर याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन अपराध केले आहेत. आरोपींनी खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, अपहरण, जबरी चोरी, पोलिसांच्या आदेशाचा भंग, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करेण असे गंभीर गुन्हे केले आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे, पोलीस अंमलदार अतुल भिंगारदिवे, रामदास गोणते, गोविंद फड, किरण तळेकर, विजय खिलारी व निती कातुर्डे यांच्या पथकाने केली.

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल

Related Posts