IMPIMP

Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

समर्थ पोलिस स्टेशनमध्ये उभारण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रूमचे उद्घाटन

by nagesh
Pune Police-PMC | The need for the police and the municipality to work together - Commissioner of Police Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणे शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलिस विभाग आणि महानगरपालिका (Pune Police-PMC) यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत (Pune Police-PMC) लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रूम याचे उत्तम उदाहरण आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीचे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मंगळवारी व्यक्त केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (PMC House Leader Ganesh Bidkar) यांच्या विकासनिधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या (Samarth Police Station)
हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम (Control Room) उभारण्यात आली आहे.
याचे उद्घाटन पोलिस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble), सभागृह नेते गणेश बिडकर महापालिका आयुक्त विक्रमकुमार
(pmc commissioner vikram kumar), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू ताम्हाणे (senior police inspector vishnu tamhane) यांच्यासह पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

गृह विभागामार्फत संपूर्ण शहरात एक हजारापेक्षा अधिक कॅमेरे बसविण्यात आलेले असून अजून १४०० कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले प्रकल्प करताना निधीची अडचण येते महापालिकेने यासाठी निधी दिल्यास नागरिकांच्या हिताचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील.
पुणे पोलिसांनी ई व्हेईकलसाठीचा प्रस्ताव महापालिकेला दिला असून पुढील काही दिवसांमध्ये हा प्रकल्प देखील कार्यान्वित होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत पोलिसांना देण्याचा प्रयत्न आहे.
असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसविण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रूपये तसेच पोलिस वसाहती सुधारण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार कांबळे यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे किती आवश्यक आहे, हे पोलिस अधिका-यांनी स्पष्ट केल्यानंतर तातडीने यासाठी विकास निधी उपलब्ध करून
दिल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
या कार्यक्रमात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक ताम्हाणे यांनी प्रास्ताविक केले. तर पोलिस निरिक्षक (गुन्हे) उल्हास कदम (police inspector ulhas kadam) यांनी आभार मानले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला.
वेगवेगळ्या ठिकाणी १५० कॅमेरे लावण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम देखील उभारण्यात आलेली आहे.
अशी व्यवस्था असलेले समर्थ पोलिस स्टेशन पहिलेच पोलिस स्टेशन ठरले आहे, याचा विशेष आनंद आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

– पोलिस स्टेशनच्या हद्दीत ६० ठिकाणी कॅमेरे लावले.

– हॅस्पिटल, बसस्टँड, गणेश मंडळे, एटीएम सेंटरसह गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य

– २४ चौक झाले कव्हर

– एकूण ११ किलोमीटरचा भाग देखरेखीखाली

– पालखी सोहळा, गणेशोत्सव काळत होणार विशेष उपयोग

– कंट्रोल रूमचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयातील मुख्य कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Police-PMC | The need for the police and the municipality to work together – Commissioner of Police Amitabh Gupta

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’

Supreme Court | पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक ‘सेक्स’ करणं ही क्रूरता – सुप्रीम कोर्ट

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

 

Related Posts