IMPIMP

Pune University Crime | WhatsApp मेसेजवरुन पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune University Crime | व्हॉट्सअॅप मेसेजवरुन पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि.1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील फुडमॉल (SPPU Food Mall) जवळ घडली.

पुणे विद्यापीठ आवारातील फूड मॉल जवळील स्कील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली. त्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police Station) घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अद्याप कोणीही तक्रार देण्यास आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली आहे.

Madha Lok Sabha Election 2024 | माढा लोकसभा मतदारसंघातून पुण्याचे प्रवीण गायकवाड?

Related Posts