IMPIMP

Rashtra Seva Dal | राष्ट्र सेवा दलाचे डॉ. गणेश देवी आणि कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

by nagesh
Rashtra Seva Dal | disputes rashtra seva dal front dr serious allegations against ganesh devi and kapil patil

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  लोकभारतीचे आमदार आणि राष्ट्रसेवा दलाचे (Rashtra Seva Dal) कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील (Kapil Patil) व राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी (Dr. Ganesh Devi) यांच्यावर मनमानी कारभाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप राष्ट्र सेवा दलाच्या (Rashtra Seva Dal) माजी अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांकडून केला गेला आहे. यावरून निषेध म्हणून मिळालेले पुरस्कार देखील परत करण्यात आले आहेत. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे (Prakash Kambale) यांनी सोमवारी (9 ऑगस्ट) रोजी क्रांती दिनाच्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे (Prakash Kambale) यांनी पुण्यात (Pune)आज माध्यमाशी सवांद साधला.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार कपिल पाटील यांनी आपल्या मर्जीतील लोकभारती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सेवादलाचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती केलीय.
तर, त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्र सेवादलाचा गैरवापर सुरू केलाय.
त्यांचा संघटनेतील हस्तक्षेप वाढला आहे.
कधीही सेवादल सदस्य नसलेल्या गणेश देवी यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले.
कपिल पाटील यांनी देवींमार्फत बेकायदेशीरपणे राष्ट्रसेवा दल वर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा गंभीर आरोप सुद्धा देखील प्रकाश कांबळे यांनी केलाय.

 

पुढे ते म्हणाले की, आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कपिल पाटील (Kapil Patil) यांनी अडचणीचे ठरतील अशा ज्येष्ठ सेवादल विश्वस्त आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं बेकायदेशीरपणे निलंबन केलं.
प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेबाहेर घालवलं.
संघटनांर्तगत लोकशाहीचा व सेवा दल संविधानाचा अनादर करत कपिल पाटील व गणेश देवी हे सध्या सेवादलात मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
तसेच, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळालेले श्रीकांत लक्ष्मी शंकर (Srikanth Lakshmi Shankar)
यांनी म्हटलं आहे की, ‘देशातील लोकशाही, संविधान वाचविण्याची सदैव भाषा बोलणारे भाषातज्ञ गणेश देवी लोकशाहीविरोधी, मनमानी पद्धतीने काम करत आहेत.
या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अडीच ते तीन दशके कार्यकर्ते असलेल्या सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आपले पुरस्कार परत करताहेत,असे ते म्हणाले.

 

या दरम्यान, ‘कपिल पाटील (Kapil Patil) कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रत्यक्ष बैठका
टाळत आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा प्रभाव टाकत पोलीस यंत्रणेवर दबाव आणला.
यातून त्यांनी सेवादल सैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
असं असलं तरी राष्ट्र सेवा दलाचे स्वतंत्र, समाजवादी अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सर्व सेवादल सैनिक सनदशीर मार्गाने सेवादल वाचविण्याच्या आपला लढा सुरूच ठेवतील, असं देखील यावेळी म्हटलं आहे. यावेळी सेवादल सैनिक मिहीर थत्ते, सुहास कोते, जीवराज सावंत आदी महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Rashtra Seva Dal | disputes rashtra seva dal front dr serious allegations against ganesh devi and kapil patil

 

हे देखील वाचा :

Murder in Shirur | धक्कादायक ! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून

Pune News | मराठा उद्योजक लॉबी कमिटीचा कर्जत येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

State Board CET 2021 | ’11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी तारीख जाहीर

 

Related Posts