IMPIMP

Serum Institute | सीरमकडून महत्त्वपूर्ण घोषणा; कोविशील्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील क्वारंटाईनचा खर्च उचलणार

by nagesh
Serum Institute | adar poonawalla tweets rs 10 crore overseas for covishield vaccine students quarantine in britain

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Serum Institute | कोरोनाचा संसर्ग (Corona virus) काही कमी झालेला नाही. अजूनही बाधितांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या विषाणूने वातावरणाशी जुळवले आहे. त्यामुळे डेल्टा (Delta) सारख्या प्रकारातील रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, परदेशात कोविशील्ड लस घेतलेल्यांना थेट प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यांना तेथे काही दिवस क्वारंटाईन (Quarantine) व्हावं लागत आहे. त्यामुळे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

कोविशील्ड (Covishield) लस घेऊन परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनिवार्य क्वारंटाईनसाठी सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute)10 कोटीची तरतूद केली असल्याचे म्हंटले आहे. अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, प्रिय विद्यार्थ्यांनो, काही देशांमध्ये कोविशील्डची (Covishield) लस घेतलेल्यांना अद्याप थेट प्रवेश मिळत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य आहे. या परिस्थितीत तुम्हाला काही खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी मी 10 कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला गरज असल्यास कृपया अर्ज करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

ब्रिटननं भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये (Red list) केला. मात्र त्यानंतर आता भारताला 8 ऑगस्टपासून अँबर लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये गेलेल्या भारतीयांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागत. रेड लिस्ट मध्ये असताना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अनिवार्य होतं. मात्र, आता अँबर लिस्टमध्ये आल्याने घरी किंवा अन्य ठिकाणी क्वारंटाईन (Quarantine) राहण्याची मुभा आहे.

 

 

Web Title :- Serum Institute | adar poonawalla tweets rs 10 crore overseas for covishield vaccine students quarantine in britain

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | आठवडाभर पाऊस घेणार विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज

Pavana Dam | पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा

Supreme Court | त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

RBI Monetary Policy | RBI पॉलिसीच्या या प्रमुख गोष्टी तुम्ही आवश्य जाणून घ्या, रेपो रेटमध्ये बदल केला का? वाचा सर्वकाही

 

 

 

Related Posts