IMPIMP

Shivajirao Adhalrao Patil | अजित पवार, वळसे-पाटलांच्या उपस्थितीत आज आढळराव राष्ट्रवादीत जाणार, महायुतीची मोठी खेळी! शरद पवारांना शह

by sachinsitapure

पुणे : Shivajirao Adhalrao Patil | शिंदे गटाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात आज दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार आहेत. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke), आमदार चेतन तुपे (MlA Chetan Tupe) आदी उपस्थित राहणार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकुणच महायुतीने शरद पवारांना (Sharad Pawar) शह देण्यासाठी मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. येथील शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशा मोठ्या नेत्यांनी ही खेळी खेळली असल्याचे दिसत आहे.

कारण, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे, असे वक्तव्य पुण्यातील आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी केले आहे. आपल्या पक्षातील एक मोठा नेता अजित पवारांच्या गटात प्रवेश करत असताना एकनाथ शिंदे आढळरावांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल कसा देऊ शकतात?, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या अढळरावांची पाठराखण करताना असेही म्हटले की, आढळराव हे खासदार नसतानाही गेली पाच वर्षे सतत जनतेत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

पंधरा वर्षे खासदारकीचा त्यांना अनुभव आहे. आढळरावांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप व सर्व मित्रपक्ष एकजुटीने प्रचार यंत्रणा उभी करणार आहेत. आंबेगाव तालुक्यातून किमान एक लाखाचे मताधिक्य आढळराव यांना मिळेल, असा विश्वास आहे, असे विष्णू हिंगे यांनी म्हटले आहे.

Pune Crime Branch | पुणे : सराईत मोबाईल चोर गजाआड, गुन्हे शाखा युनिट 5 ची कारवाई

Related Posts