IMPIMP

Shivsena Vijay Shivtare On NCP Ajit Pawar | अजित पवारांच्या विरोधात उतरलेले शिवतारे इरेला पेटले, म्हणाले ”वेळ पडली तर शिवसेनेचा…” (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Shivsena Vijay Shivtare On NCP Ajit Pawar | मी सध्या तांत्रिक बोलत आहे. मी आरेला कारे करत नाही. या धरणाच्या कामाच्या प्रश्नावर उत्तर द्या. लोकांची अजित पवार यांना मतदान करण्याची इच्छा नाही. महायुतीचा धर्म जरुर पाळला पाहिजे, महायुतीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल तर आम्ही ठरवू, वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ. आमचे सर्व कार्यकर्ते सध्या या मानसिकतेत आहेत, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.(Shivsena Vijay Shivtare On NCP Ajit Pawar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजित पवार-विजय शिवतारे यांच्यातील वादानंतर शिवतारे यांना समजावले असले तरी बारामती मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात पूर्ण ताकद एकवटून शिवतारे उतरल्याचे दिसत आहे. आता तर त्यांनी वेळ पडल्यास शिवसेनेचा राजीनामा देईन, असा इशारा एकनाथ शिंदे यांनाच दिला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना शिवतारे पुढे म्हणाले, १५ वर्षे खासदार अजित पवार यांच्या बहिण सुप्रिया सुळेच (Supriya Sule) होत्या. तरीही त्यांनी धरणासाठी पैसे दिले नाहीत. आता ते आपल्या विचाराचा खासदार निवडून द्या, पैसे देतो म्हणत आहेत. मग अगोदर कोणत्या विचाराचा खासदार होता.

ते पुढे म्हणाले, या धरणाचे पाणी फक्त पुरंदरलाच नव्हे, तर भोर, व्हेला परिसराला सुद्धा मिळणार आहे.
या पाण्यासाठी किती वेळा खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठका घेतल्या.
या धरणाचे काम पूर्ण झाले नाही याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे.

काय म्हणाले होते अजित पवार…

शिवतारे यांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले होते की, शिवतारेंच्या उमेदवारीचे मला माहित नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन त्यांना सांगितले आहे.
आता वरिष्ठांचे ऐकायचे, नाही ऐकायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही.
आम्हीही आरेला कारे करु शकतो. आम्हाला महायुतीमधील वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आता विजय शिवतारे यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत
देत शिवसेनेचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

Related Posts