IMPIMP

Suicide In Katraj Dam Pune | कात्रज तलावात तरुणीची उडी मारुन आत्महत्या

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Suicide In Katraj Dam Pune | कात्रज तलावात तरुणीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवुन तलावात बुडालेल्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढाला. दरम्यान, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून मृत तरुणीची ओळख पटवण्यात येत आहे.

मृत तरुणी अंदाचे 23 वर्षाची असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री एका तरुणीने कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाला (Pune Fire Brigade) मिळाली होती. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. मात्र, अंधार झाल्याने जवानांनी शोधमोहीम थांबविली होती.

त्यानंतर रविवारी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. जवानांनी बोटीतून पहणी केली असता तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठविण्यात आला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना

Related Posts