IMPIMP

Sangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

by nagesh
Wardha Crime | girlfriend leaves boyfriend commits suicide after getting out of jail at wardha

सांगली (Sangli): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Sangli Crime । सांगलीतील (Sangli Crime) एका डॉक्टराने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री फ्लॅटमध्ये असलेल्या दोन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. डॉ. दीपक रामकृष्ण राऊत (वय, 55, रा. निर्मिती रेसिडेन्सी, चिंतामणीनगर, सांगली) असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहीती अशी की, सांगलीतील चिंतामणीनगर येथील निर्मिती रेसिडेन्सीमध्ये (फ्लॅट नंबर 402) मध्ये डॉ. दीपक राऊत (Dr. Deepak Raut) हे वास्तव्यास होते. डॉ. राऊत हे विश्रामबाग येथील आदित्य रुग्णालयात कार्यरत होते. राहत्या घरी त्यांनी बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला पांढर्‍या रंगाच्या ओढणीने गळफास घेतला आहे. हा प्रकार पहाटे 6 च्या दरम्यान समोर आला आहे. याबाबत माहीती मिळताच संजयनगर पोलीसांनी (Sanjaynagar Police Station) घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह सरकारी रुग्णालयात तपासणी केला. त्यानंतर मृतदेह कुंटूबीयांच्या ताब्यात दिले गेले.

 

 

दरम्यान, या डाॅक्टराने लिहीलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहीलं आहे की, ताई, दादा, पिंकू मला माफ करा, मी स्वखुशीने जीवन संपवत आहे. याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असं डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, पती- पत्नीत वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्याद डॉ. राऊत यांच्या नातेवाईक वर्षा सचिन माने यांनी दिली आहे. तर, डॉ. राऊत यांच्या पत्नी या महापालिकेत नोकरीस आहेत.

 

 

या दरम्यान, मंगळवारी रात्री डॉ. राऊत हे ‘मी आत्महत्या करणार’, असे म्हणत होते.
त्यासाठी त्यांनी दोरीही घेतली होती. ही माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.
नजदिक पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.
डॉ. राऊत यांच्याकडील दोरी काढून घेतली. त्यांची समजूत काढून शांत केले होते.
तरीही त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले. असं पोलीसांनी (Police) सांगितलं आहे.

 

 

Web Title :- Sangli Crime | Doctor commits suicide by strangulation, shocking incident in Sangli

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या उच्चशिक्षीत तरुणीचा पाय घसरून मृत्यू

Pune Crime | आरक्षित जमीनीच्या वादातून पंचायत समिती सभापतीने दाखवले पिस्तुल, FIR दाखल

Modi Government | मोदी सरकार 2.0 साठी खास आहे 5 ऑगस्ट, यावेळी सुद्धा विरोधकांना देणार का आश्चर्याचा धक्का?

 

Related Posts