IMPIMP

Lonand Railway Accident | दुर्देवी ! रेल्वेच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू

by nagesh
Lonand Railway Accident | Unfortunate! Baap-leka killed in train collision

लोणंद : सरकारसत्ता ऑनलाइन  Lonand Railway accident | लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत बापलेकाचा मृत्यु (Lonand Railway Accident) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. बंगळुरू- जोधपूर एक्‍सप्रेस (bengaluru jodhpur express) रेल्वे गाडी नंबर 06506 या रेल्वेच्या धडकेमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना रविवारी (26 सप्टेंबर) रोजी घडली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या घटनेत खंडाळा तालुक्यातील अंदोरी (Andori) येथील SRPF मध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (Shailesh Dnyaneshwar Bodke) (वय 28) आणि त्याचा 1 वर्षाचा मुलगा रुद्र बोडके (Rudra Bodke) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अंदोरी येथील शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. बोडके सुट्टी घेऊन 2 दिवसांपूर्वीच अंदोरी येथे घरी आले होते.

दरम्यान, शैलेश बोडके त्यांच्या रुद्र या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर (Lonand Railway Accident) गेले असता बंगळुरु-जोधपूर एक्‍सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. पाटोळे, (API V. R. Patole) आदीनाथ भोसले (Adinath Bhosale) व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

 

Web Title : Lonand Railway Accident | Unfortunate! Baap-leka killed in train collision

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘…अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही’

Hinjewadi-Shivajinagar Metro | प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मिळाला ‘मुहूर्त’

Pune Police | गुन्हे शाखेचा शहरात रिक्षाचालकांविरोधात ‘ड्राईव्ह’, अनेक रिक्षाचालकांवर कारवाई

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या

 

Related Posts