IMPIMP

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर ठरणार ‘महाविकास’ची ‘लोकप्रियता’ अन् राष्ट्रपती राजवटीची ‘दिशा’ !

by nagesh
Pandharpur by election will determine the direction of the presidential rule in the state and Popularity of Mahavikas

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – पंढरपूर(Pandharpur)-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर Pandharpur विधानसभेची जागा रिक्त होती. त्यानंतर आता या पदासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी प्रचारात उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरणाऱ्या भाजपने अनेक प्रयत्न केले आहेत. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; तब्बल 2.5 हजार पोलिस राहणार तैनात

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्रित मिळून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूर Pandharpur पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारची लोकप्रियता ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Also Read :

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

Related Posts