IMPIMP

IPL चे सामने मुंबईत ? आयपीएल, बीसीसीआयच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट

by bali123
ipl 2021

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी आहे मात्र बीसीसीआयनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. यापूर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यासाठी मुंबईची निवड केली होती. पण कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लादण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहेत अशात आयपीएलला परवानगी मिळेल कि नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी भेट घेतली. मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या पर्वातील सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना दिले. याबाबतचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

बीसीसीआयनं यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. मुंबईबद्दल राज्य सरकारच्या परवानगीनंतर अंतिम निर्णय होईल, असेही त्यावेळी बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते. दरम्यान मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईत आयपीएल सामने होणार कि नाही याबाबत साशंकता वाटत होती त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय व आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

अहमदाबाद किंवा चेन्नई येथे ५० टक्के चाहत्यांना सामान पाहण्यसाठी परवानगी मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही तशीच परवानगी मिळण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे एक सदस्याने सांगितले. येत्या काही दिवसांत गव्हर्निंग काऊंसिलची बैठकी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

हैदराबाद, जयपूर आणि मोहाली यांच्याकडून दबाव

आयपीएल सामन्यांसाठी हैदराबाद, जयपूर आणि मोहाली या शहरांचा विचार करण्यात यावा,
यासाठी सनरायझर्स हैदराबाद,
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या तीनही फ्रँचायझींनी बीसीसीआयला पत्र पाठवून दबाव वाढवला आहे.
या वृत्ताला पंजाब किंग्सचे सह-मालक नेस वाडिया यांनी दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले कि, मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी याआधीही बोललो आहे आणि चंडीगढ येथे सामने
खेळवावेत अशी विनंती केली आहे.

Video : नितेश राणेंचा सरकारवर घणाघात; ‘कोरोना’, ‘टक्केवारी’, ‘पूजा चव्हण’ अशा अनेक प्रकरणांवरून केले गंभीर आरोप

Related Posts