IMPIMP

Punjab Kings Xi IPL 2021 Auction : पंजाबच्या संघाने नावात का बदल केला ? कर्णधार केएल राहुलने केला खुलासा

by sikandershaikh
panjab-kings-Xi

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)IPL च्या यंदाच्या मोसमासाठी च्या लिलाव प्रक्रियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब (Punjab Kings Xi) संघाने नावात बदल केला असून लोगो देखील बदलला आहे. आता हा संघ पंजाब किंग्ज या नावाने ओळखला जाणार आहे. पण 13 वर्षांनंतर पंजाबच्या संघाने आपल्या नावात बदल करण्यामागचे नेमक कारण काय ? याचा खुलासा संघाचा कर्णधार केएल राहुल याने केला आहे. माझ्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब हे नाव देखील आवडत होत. पण हा संघ फक्त 11 खेळाडूंचा नाही. त्यापेक्षा एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि त्याच पद्धतीच वातावरण संघात आहे. त्यामुळेच संघाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे नवे नाव संघाच नशीब बदलणार ठरेल अशी आशा राहुल यांनी व्यक्त केली आहे.

पंजाब किंग्ज (Punjab Kings Xi) संघाने आपल्या नावात आणि लोगोमध्ये बदल केल्याची घोषणा ट्विटर हँडलवरुन केली आहे. पंजाबच्या संघाने नाव आणि लोगो बदलण्यासोबत संघात काही महत्वाचे बदल देखील केले आहेत. पंजाबने ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला करारमुक्त केले आहे.
अनिल कुंबळेच यंदाही संघाच्या प्रशिक्षकपदी पाहायला मिळणार आहेत.
तर केएल राहुलकडे संघाचं नेतृत्व असणार आहे.
मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल यांच्या पंजाब किंग्ज संघाला आजवर एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही.

दरम्यान केएल राहुल याच्यासह संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यानेही संघाच्या नव्या नावाचे कौतुक केले आहे.
संघाचे नवे नाव मला खूप आवडले आहे. बदल करत राहणे हे खूप चांगले आहे.
केएल राहुलशी मी पूर्णपणे सहमत आहे. आमचा संघ हा फक्त 11 खेळाडूंचा नाही.
सर्व खेळाडू आणि व्यवस्थापन, प्रशिक्षक या सगळ्यांचा मिळून संघ तयार होतो, असे गेल म्हणाला.

भाजपच्या खा. रक्षा खडसेंना ‘कोरोना’ची लागण ! Tweet करत दिली माहिती

Related Posts