IMPIMP

200 वर्षे जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्याबाबत जाणून घ्या

by sikandershaikh
red-fort-delhi

नवी दिल्ली :  दिल्लीचा लाल किल्ला एक ऐतिहासिक किल्ला (Red Fort in Delhi) आहे. हा किल्ला दिल्लीसह भारताचीही शान आहे. लाल किल्ला हा सुमारे 200 वर्षे जुना आहे. हा किल्ला 1857 पर्यंत मुघल वंशाच्या सम्राटांचे मुख्य निवासस्थान होते. मुघल साम्राज्याच्या सम्राट आणि त्यांच्या कुटुंबाच्या भेटीगाठीसह मुघलांसाठी औपचारिक आणि राजकीय केंद्रही बनले होते.

लाल किल्ला दिल्लीचे एक अत्यंत जुने आणि आकर्षक असे पर्यटनस्थळ आहे. लाल किल्ला हा लाल संगमरवरपासून बनला आहे आणि सुमारे 250 एकर परिसरात हा किल्ला पसरला आहे. यामध्ये केली गेलेली कामगिरी अत्यंत सुंदर आहे. या लाल किल्ल्याच्या निर्मितीची सुरुवात मुस्लिमांनी त्यांच्या मोहरमच्या दिवशी 13 मे, 1638 मध्ये मुघल सम्राट आणि शाहजहाँने केली. या किल्ल्याचे डिझाईन त्यावेळचे प्रसिद्ध वास्तूकार उस्ताद अहमद यांनी केले होते.

असा आहे लाल किल्ल्याचा इतिहास

– औरंगजेबनंतर 1712 मध्ये लाल किल्ल्यावर जहंदर शाह
– एका वर्षानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर फर्रूक्षियारने लाल किल्ल्यावर कब्जा केला. त्याने सर्व चांदीचे छत बदलून तांबेचे केले.
– त्यानंतर 1719 मध्ये मोहम्मद शाह याने हा किल्ला काबिज केला.
– 1803 मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीने मराठा सेनेला हरवून लाल किल्ल्यावर कब्जा केला.
– 1800-1900 यादरम्यान ब्रिटिश लॉर्डने तुटलेला भाग पुन्हा बनविण्याचे आदेश दिले.
– 1747 मध्ये नादिर शाह आणि त्यानंतर ब्रिटिशांनी किल्ल्यातील सर्व लुटले आणि बाहेरच्या लोकांना विकले.
– इतकेच नाही तर शाहजहाँच्या वेळी कोहिनूर हिरा आणि बहादूर शाह जफरचा मुकूटही आज लंडनमध्ये आहे.

लाल किल्ल्यातील (Red Fort in Delhi) इतर काही प्रेक्षणीय स्थळं

छावरी बाजार, लाहोरी दरवाजा, दिल्ली दरवाजा, पाणी दरवाजा, छत्ता चौक, नौबत खाना, दीवान-ए-आम, नहर-ए-बिहिस्त, मुमताज महल, रंग महल, खास महल, दीवान-ए-खास, हम्माम आणि मोती महल यांसारखी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत.

जेलच्या गेटमधून गजानन मारणेची मिरवणूक निघालीच कशी ? कारागृह प्रमुखांचे चौकशीचे आदेश

Related Posts