IMPIMP

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन पोलीस भरती 2019 (Police Recruitment – 2019) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्यास सांगण्यात आले होते. तसेच सर्व उमेदवारांना पासवर्ड बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पोलीस भरती 2019 (Police Recruitment – 2019) साठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांचा ईमेल आयडी (Email ID) विसरलेला आहे किंवा लक्षात नसल्याच्या तक्रारी प्रप्त झाल्या आहेत. अशा उमेदवारांना त्यांचा पासवर्ड, इमेल आयडी अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय कुमार (Additional Director General of Police Training and Special Squads Sanjay Kumar) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलीस भरती 2019 मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी 30 जुलै रोजी शुद्धीपत्रक काढले होते.
यामध्ये उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत (choosing options) कळवण्यात आले होते.
तसेच पासवर्ड बदले गरजेचे आहे, अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवदेन पत्र (Application form) उघडू शकणार नाहीत.
याशिवाय एसईबीसीच्या (SEBC) उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा EWS या पैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे.
मात्र, काही उमेदवार आपला ईमेल आयडी विसरले आहेत.

 

 

या पार्श्वभूमीवर ज्या उमेदवारांचे ईमेल आयडी विसरल असतील किंवा लक्षात नसतील त्यांना ईमेल अपडेट करण्यासाठी आणि विकल्प निवडण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना 22 ऑगस्ट 2021 रोजी 12 पर्यंत आपली माहिती अपडेट (Information update) करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

 

माहिती अपडेट कशी करायची

उमेदवारांनी आपली माहिती अपडेट करण्यासाठी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जावे. या ठिकाणी ‘पोलीस कॉर्नर’ ह्या बटनला क्लिक करावे. ‘पोलीस भरती 2019’ येथे क्लिक करा.
संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा Email ID/ Password बदल करुन घ्यावा.

 

 

Web Title : Police Recruitment – 2019 | Extension of deadline for updating information to candidates who have applied for Police Recruitment 2019 – ADG Sanjay Kumar

 

हे देखील वाचा :

Weather Update | आगामी 5 दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Modi Government | मोदी सरकारच्या योजनेत दरमहिना एक रुपया खर्च करून मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या

Pune Corporation | भाजपच्या ‘त्या’ याचिकेविरोधात शिवसेनेचे ‘भिकमागो’ आंदोलन

 

Related Posts