IMPIMP

Maharashtra Government | महाराष्ट्र शासनाच्या 29 विभागांमध्ये तब्बल दोन लाख 193 जागा रिक्त

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

सरकारसत्ता ऑनलाइन  – Maharashtra Government | प्रत्येकालाच सरकारी नोकरी (sarkari naukri) हवी असते. काही दिवसापासून सरकारी नोकऱ्यांसाठी (Govt. Job) होणारी भरती रेंगाळलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यातच कोरोना संकटाने तर आणखी त्याला विलंब लागला आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असून त्यासाठी मेगा भरती होणार असे म्हंटले जात आहे. मात्र नेमक्या किती जागा रिक्त आहे हे कोणीही सांगितले नाही. दरम्यान, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने रिक्त जागांसंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासनाकडे माहिती मागवली होती. त्यामध्ये (Maharashtra Government) शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदाेन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त जागांमध्ये जिल्हा परिषदांमधील तब्बल ४६ हजार ९६२ जागा आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गेल्या १५ वर्षांत किती जागा भरल्या गेल्या, सध्या किती रिक्त आहेत, यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल पांडुरंग ठाकरे यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे माहिती मागितली हाेती. त्यावेळी सामान्य प्रशासनाने केवळ २९ विभागाची दिलेल्या माहितीतुन हे वास्तव समोर आले आहे. उरलेली नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका, मंडळ, महामंडळे, उद्याेग व इतर विभागांची माहिती दिली गेली नाही. मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्यामुळे शासनाच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत. नागरिकांना दोन तीन आठवडे थांबायला लागते. एवढेच नाही तर तहसील कार्यालयात साध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठीही विद्यार्थी व पालकांना किमान दाेन आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

 

आउटसाेर्सिंग, कंत्राटीवर जाेर

राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरी मिळत नाही म्हणून अनेकांची स्थिती बिकट झाली असून तरुण वाममार्गाला लागला आहे. असे असतानाही नव्या नोकरभरती ऐवजी शासनाचा आउटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जाेर दिसताे. कारण निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात असल्याचे दिसत आहे.

 

 

‘एमपीएससी’ची संथगती

राज्य लाेकसेवा आयाेगाची सरळसेवा भरतीबाबतही संथगती पहायला मिळते. काॅललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागताे आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर आयोगाने २०१८ला फाैजदार पदासाठी काढलेली जाहिरात. या पदासाठी २०१९ ला निवड झाली मात्र त्यानंतर दीड दोन वर्ष उलटल्यानंतर २०२१ मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे.

 

 

 गृहविभागात (home department maharashtra) सर्वाधिक रिक्त जागा

राज्यात जेवढी पदे रिक्त आहेत त्यापैकी सर्वाधिक २४८७८ पदे एकट्या गृहविभागात आहेत. त्या खालाेखाल जलसंपदा २० हजार ८७३, तर सार्वजनिक बांधकाम विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हणजे मृदा व जलसंधारण विभागात एकही पद रिक्त नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

 

 

– शासकीय सेवेतील पदे

विभाग – २९

एकूण पदे – १०,९९,१०४

सरळसेवेची पदे – ७,८०,५२३ पदे

पदोन्नतीची पदे – ३,१८,५८१

भरलेली एकूण पदे – ८,९८,९११

 

 

– रिक्त पदे २ लाख १९३ पदे

सरळसेवेची रिक्त पदे १ लाख ४१ हजार ३२९

पदोन्नतीची रिक्त पदे ५८ हजार ८६४

जिल्हा परिषदांतील स्थिती

रिक्त पदे ४६,९६२

सरळसेवेची रिक्त पदे ४२,९७१

पदोन्नतीची रिक्त पदे ३,९९२

 

 

– वर्गवारीनुसार रिक्त पदे

अ वर्ग – १० हजार ५४४

ब वर्ग – २० हजार ९९९

क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५

ड वर्ग – ४० हजार ९४४

एकूण – २ लाख १९३

 

Web Title : Maharashtra Government | two lakh vacancies in 29 department of maharashtra government sarkari naukri

 

हे देखील वाचा :

Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांना 2,18,200 रुपये देईल मोदी सरकार, ऑक्टोबरमध्ये अकाऊंटमध्ये येऊ शकतात पैसे, जाणून घ्या

Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणुन घ्या आजचे दर

 

Related Posts